सुंदर दिसण्याचा हा छंद बनतोय जीवघेणा? नकळत कॅन्सरला आमंत्रण

आरोग्य

प्रत्येक महिलेला ती सुंदर दिसावी असं वाटतं. त्यासाठी त्या विविध कपडे, साड्या, ज्वेलरी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेकअप. मेकअप म्हणजे महिलांचा आवडता विषय, मग त्यात पावडर, फाऊंडेशन क्रीम, लिपस्टीक, आयलायनर, आणि नेल पॉलिश अशा विविध सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. महिलांना हात-पायांच्या नखांवर नेलपॉलिश लावायला आवडते. विशेषत: जेव्हा एखादा विशेष प्रसंग असतो. मुलीही प्रसंगानुसार नखांना वेगवेगळे रंग लावताना दिसतात. काही मुलींना रोज नेल पेंट बदलण्याची क्रेझ असते. पण तुम्हाला माहित आहे का? नेलपेंट लावल्याने कॅन्सरही होऊ शकतो.

नेलपॉलिशमुळे कर्करोग कसा होऊ शकतो

नेलपॉलिश लावणे बंद करावे असे अद्याप कोणीही तज्ज्ञ म्हणत नसले, तरी काही रिपोर्ट आणि लोकांच्या मते नेलपॉलिशमध्ये कार्सिनोजेनिक घटक असतात. खरं तर, नेल पेंट बनवण्यासाठी त्यात टोल्युइन, फॉर्मल्डिहाइड आणि डिप्रोपाइल सारखे पदार्थ मिसळले जातात, ज्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. नेल पेंट वापरणे धोक्याचे ठरू शकते. नेलपॉलिश बनवण्यासाठी अनेक रसायने वापरली जातात, जी कर्करोगजन्य असतात. या रसायनांपासून बनवलेले नेल पेंट लावल्याने तुम्हाला कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

नेल पेंट खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. जेव्हाही तुम्ही नेलपॉलिश खरेदी करता तेव्हा आधी त्यामागे लिहिलेले साहित्य वाचा

टोल्युएन

फॉर्मल्डिहाइड

डाइब्यूटिल फथलेट

कापूर

जाइलीन

तुमच्या नखांची अशी काळजी घ्या

केमिकल फ्री नेल पेंट लावा.

वर नमूद केलेल्या गोष्टींपासून बनवलेले नेलपॉलिश लावू नका.

नखांमध्ये काही इन्फेक्शन असेल तर त्या वेळी कोणतेही नेल पेंट लावू नका.

उच्च चमक आणि चमकदार रंगाचे नेलपॉलिश वापरणे टाळा.

(सोशल मीडियावरून साभार)