तुम्हाला सर्दी, खोकला किंवा हवामानात बदल होताच संसर्ग होत असेल, तर याचा अर्थ तुमची रोगप्रतिकार शक्ती खूपच कमकुवत झाली आहे. साहजिकच खोकल्यामुळे तुमच्या दैनंदिन कामावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्याशिवाय सारखा खोकला होतो किंवा संसर्ग होतो म्हणून त्यासाठी तुम्ही सारखी औषधे घेत असाल, तर त्यामुळेही शरीरावर विविध दुष्परिणाम होऊ शकतात. अशा वेळी तुम्हाला औषधांपेक्षा घरगुती उपायांची जास्त गरज असते; ज्यांचे अॅलोपॅथिक औषधांप्रमाणे दुष्परिणाम नसतात. त्यामुळे तुम्ही सर्दी आणि खोकल्यासाठी अनेक घरगुती उपाय करून पाहू शकता.
साहित्य
१ संत्रे
१ टीस्पून – मीठ
१/२ टीस्पून – हळद
काळी मिरी एक चिमूटभर
चिमूटभर दालचिनी
मध
कृती
अख्ख्या संत्र्याचा फक्त वरचा भाग कापून घ्या. आता त्याच्या आतली थोडी संत्री काढा आणि त्यामध्ये हळद, काळी मिरी व मीठ घाला. आता हे संत्र गॅसवर ठेवा आणि सुरुवातीला संत्र्याचा कापलेला वरचा भाग संत्र्यावर ठेवून, ते झाकून ठेवा. आता चमच्यानं संत्र्याच्या आतला रस हलवत राहा. आता गॅस बंद करा आणि संत्र्याच्या आतमध्ये तयार झालेलं सिरप एकेक चमचा दिवसातून दोन ते तीन वेळा घ्या.
(सोशल मीडियावरून साभार)