पेरू हे आपल्या देशातील एक प्रमुख फळ आहे. पेरू आपण सर्वच जण खूप आवडीने खातो. असे फार कमी लोकं असतात की त्यांना पेरू आवडत नाहीत. हिरव्या रंगाचे पेरू खायला गोड असतात. पेरूमध्ये छोट्या छोट्या शेकडो बिया असतात. पेरू हे खूप सहज मिळणारे फळ आहे. अनेक जणांच्या घरांमध्ये सुद्धा पेरुचे झाडं लावलेली असतात.
पेरू वाढवतात रोगप्रतिकारक क्षमता
पेरू हे खूप सहजासहजी मिळणारे फळ आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना हे खाल्याने होणाऱ्या फायद्याविषयी माहिती नसते. खूप कमी लोकं असतील ज्यांना पेरूंपासून आरोग्यासाठी होणाऱ्या फायद्याची कल्पना असेल. पेरूमध्ये असणारे व्हिटॅमिन आणि खनिज शरीराला अनेक प्रकारच्या आजारांपासूम वाचवण्यास मदत मिळते. सोबतच पेरू आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता अधिक मजबूत करतात.
बदलत्या जीवनशैलीमुळे माणसाला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. आजच्या काळात कॉम्पुटर चा उवयोग प्रत्येकाचा खूप जास्त वाढला आहे. ही गोष्ट सर्वाना माहिती आहे की जास्त कॉम्पुटरचा उपयोग केल्याने त्याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर सर्वात जास्त होतो. त्यामुळे डोळ्यांची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. नजर चांगली ठेवण्यासाठी शरीरात व्हिटॅमिन ए ची आवश्यकता असते. व्हिटॅमिन ए साठी पेरू हा सर्वोत्तम स्त्रोत आहे. पेरू खाल्याने तुमची नजर चांगली राहील.
व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे बरेच वेळा रातांधळेपणा होण्याची शक्यता जास्त असते. पेरू नियमित खाल्यास रातांधळेपणा होण्याची शक्यता खूप कमी असते. वाढत्या वयानुसार उद्भवणाऱ्या डोळ्यांच्या समस्या नियमित पेरू खाल्याने कमी होऊ शकतात. विशेषज्ञांच्या मते डोळ्यांची नजर चांगली ठेवण्यासाठी पेरू किंवा पेरुचं ज्यूस अवश्य घ्यायला हवं.
पेरू काळ्या मिठासोबत खाल्यास पचनक्रिया सुधारते व पचनाच्या समस्या दूर होतात. पचनक्रियेसाठी पेटू हे सर्वोत्तम फळ आहे. छोट्या मुलांच्या पोटात जंत होत असतात तर त्यासाठी पेरू हे एक खूप उत्तम फळ आहे. पेरूच्या पानांना वाटून त्याचे पेस्ट बनवायचे आणि ते पेस्ट डोळ्यांच्या खाली लावायचे. यामुळे डोळ्यांचा खाली असणारे काळे डाग व सूज कमी होते.
जर तुम्हाला बद्धकोष्ठताची समस्या असेल तर सकाळी सकाळी उपाशीपोटी पिकलेला पेरू खाणे खूप फायद्याचे ठरते. जर तुमच्या तोंडातून वास येत असेल तर पेरूचे पानं चावल्यास फायदेशीर ठरते. यामुळे दुर्गंधी सुद्धा दूर होते आणि दातांमध्ये त्रास असेल तर तो सुद्धा कमी होतो.
पेरू औषधी उपयोग
हे लोकप्रिय फळ असून सर्वांनाच आवडते त्याला आपला पोपट तरी कसा अपवाद असेल.आपल्या सर्वांना ती बाल कविता आठवत असेलच “पोपट पोपट बोलतोस गोड खाना जराशी पेरूची फोड. ह्याचा आता जाम,आयस्क्रीम,सरबत अस,वड्या असे बरेच रूचकर पदार्थ बाजारात उपलब्ध आहेत. पेरूचे सदाहरित झाड असते,पानजाड,गोलसर,कडक,व सुगंधी असतात.कच्चा पेरू हिरवा तर पिकल्यावर पिवळा व आतील गर पांढरा व भरपुर बियांनी भरलेला असतो.हा कच्चा असताना तुरट लागतो व पिकल्यावर गोड.कच्चा पेरू खाऊ नये.खायला व औषधासाठी पिकलेला पेरू बिया काढून त्याचा गर वापरावा.पिकलेला पेरू गोड,थंड,पित्त व वात दोष कमी करणारा व कफ दोष वाढविणारा असतो.
खूप वर्षांपूर्वी पोर्तुगिजांनी दक्षिण अमेरिकेतून हे फळ भारतात आणले. सध्या भारतभर पेरूची मोठ्या प्रमाणात लागवड होते. यास “जाम’ किंवा “अमरूद’ असेही संबोधले जाते. आवळ्याच्या खालोखाल भरपूर “क’ जीवनसत्त्व देणारे हे फळ असून, पावसाळ्याच्या व थंडीच्या दिवसांत निरनिराळ्या “व्हायरस’पासून संरक्षण मिळवून देणारे आहे.
आंबट खाल्ले की सर्दी-खोकला होतो, असा एक खूप मोठा गैरसमज जनमानसात रुजलेला आढळतो. त्यामुळे सामान्यतः मुलांना चिंच, आवळा, पेरू यापासून दूर ठेवण्याकडे कल असतो. शेकड्यात एखाद्याला आंबट पदार्थ सहन होत नाही व त्याचा त्रास होतो. परंतु म्हणून सर्वांनाच या पौष्टिक फळांपासून वंचित करणे अयोग्य आहे. नियमित पेरू खाणाऱ्या लोकांमध्ये लोहाची कमतरता (anaemia) निर्माण होत नाही. कारण त्यातील “क’ जीवनसत्त्व हे लोहाचे शोषण करण्यास मदत करते.
पेरू हे अत्यंत कमी पैशात पुरेपूर पोषण देणारे असे फळ आहे. पिकलेला पेरू हा आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगला आहे. मलावरोधाचा त्रास असणाऱ्यांनी पेरूच्या हंगामात नियमित पिकलेला पेरू खाल्ल्यास पोट छान साफ होते. जुलाबामध्ये थोडा आंबट-गोड (अर्धपिकलेला) पेरू खावा. आय.बी.एस.चा त्रास असणाऱ्यांनादेखील पेरू चांगला आहे. मळमळ, उलट्या, आम्लपित्त, अग्निमांद्य अशा त्रासांमध्ये पेरू पथ्यकारक आहे.
अत्यंत कमी उष्मांक व नगण्य चरबी असलेले हे फळ स्थूलतेवर उपयुक्त आहे. ज्यांना सॅलेड खायला आवडत नाही अशांना फायबरचा फायदा पेरूपासून मिळवता येतो. मधुमेहींनी अगदी पिकलेला पेरू न खाता थोडा आंबटसर पेरू खावा. पेरूतील फेनोलिक्स (phenolics) हे अँटिऑक्सिडंट (anti-oxidant) शरीराच्या पेशींना घातक घटकांपासून वाचवते.
आयुर्वेदाने पेरू हा थंड, पचण्यास जड, पित्तशामक, रुचिकारक व बुद्धिवर्धक मानला आहे. वाताचे आजार असणाऱ्यांनी पेरू खाऊ नये, असे आयुर्वेदशास्त्र मानते.
100 ग्रॅम पेरूमध्ये निव्वळ 0.1 ग्रॅम फॅट्स आहेत व 212 मिलिग्रॅम “क’ जीवनसत्त्व आहे. स्थौल्य, उच्च रक्तदाब, हायकॉलेस्टेरॉल, मधुमेह, गाऊट, जुलाब, मलावरोध, आम्लपिस्त, ऍनिमिया, एच.आय.व्ही. (HIV) या सर्व विकारांत पेरू पथ्यकारक आहे. जुलाबात व मधुमेहींनी अर्धाकच्चा पेरू खावा व मलावरोधामध्ये पिकलेला पेरू खावा. पेरू खाण्याचा अतिरेक केल्यास जुलाब, पोटात गॅस होणे, पोट दुखणे असे त्रास संभवतात.
हिवाळ्याच्या दिवसात बाजारात पेरु विकण्यास येतात. आपण सर्वांनीच लाल आणि रसरशीत पेरु मीठ आणि चाट टाकून खाल्ले असणार. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का, की हे डेलिशियस पेरु तुमचे आरोग्य आणि सौंदर्यासाठी किती फायदेशीर आहे. व्हिटॅमीन सी, लायकोपेन आणि अँटीऑक्सीडेंट्सने परिपुर्ण पेरुमध्ये अनेक व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात जे तुमच्या बॉडीला न्यूट्रीएंट्स एब्जॉर्ब करण्यात मदत करतील.
पेरुचे खाण्याचे फायदे
1) डायबिटीजपासुन वाचवते
पेरुमध्ये रिच फायबर कंटेंट आणि लो ग्यायसेमिक इंडेक्स असल्यामुळे हे डायबिटीजपासुन वाचवते. लो ग्लायसेमिस इंडेक्स अचानक वाढणा-या शुगर लेव्हलला वाढण्यापासुन थांबवते. तसेच फायबर्सच्या कारणामुळे शुगर चांगल्या प्रकारे रेगुलेट होत राहते. पेरू खाल्ल्याने रक्तातील साखरेचा स्तर कमी होतो, कारण यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. हे साखरेला डायजेस्ट करणे आणि इन्सुलिन वाढवण्यात मदत करते. पेरू खाल्ल्यानं रक्तामध्ये साखरेचं प्रमाण कमी होतं. सोबतच पेरूचा अर्क रोज सकाळ-संध्याकाळ घेतल्यानं पचनक्रीया व्यवस्थित होते.
2) वजन कमी करण्यात मदत करते
पेरु मेटाबॉलिज्म वाढवते आणि वजन कमी करण्यात मदत करते. अमरुद खाल्ल्यानंतर पोट देखील भरते आणि कॅलरी इनटेक देखील कमी होते. कच्च्या पेरुमध्ये केली, अॅप्पल, ऑरेंज आणि ग्रेप्स सारख्या दुस-या फळांच्या तुलनेत जास्त शुगर असते. लठ्ठपणा वाढण्याचे मुख्य कारण कोलेस्ट्रॉल असते. पेरूमधील उपस्थित तत्व कोलेस्ट्रॉल कमी करतात. यामुळे वजन वाढत नाही. त्यामुळे पुढील डायट शेड्युलमध्ये पेरूला नक्की स्थान द्या.
3) इम्युनिटी बूस्टर
पेरु व्हिटॅमिन ‘सी’चा सर्वात चांगला सोर्स आहे. पेरुमध्ये संत्र्यापेक्षा चार पटीने जास्त व्हिटॅमिन ‘सी’ असते. जो तुमची रोग प्रसिरोधक क्षमता म्हणजेच इम्युनिटी पाव्हर वाढवते. यासोबतच कॉमन इन्फेक्शन्स आणि आजारांपासुन वाचवते.
4) बध्दकोष्ठ दूर करते
पेरु दूस-या फळांच्या तुलनेत डायटरी फायबरचा एक चांगला सोर्स आहे. हे तुमच्या डेली फायबर नीड्सला 12 टक्के पुर्ण करते. याच कारणामुळे हे आपल्या डायजेशनसाठी रामबाण उपायापेक्षा कमी नाही. अमरुदचे बीज पोट साफ करण्यासाठी खुप फायदेशीर असतात. यामुळे आतंड्याची स्वच्छता होते. पेरू शरीरातील मेटाबॉलिझम (चयापचय) समतोल ठेवल्यात मदत करते. यामुळे पेरूचे सेवन केल्यास बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते
5) पेरुचे पाने दात दुखी दूर करता
पेरुच्या पानांमध्ये अँटीइन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल क्वालिटी असते. जी दातांचे इन्फेक्शन दूर करण्यात आणि किड्यांना मारण्यासाठी हेल्पफुल राहते. पेरुची पाने दात दुखी दूर करण्यासाठी चांगला घरगुती उपाय आहे. पेरुच्या पानांच्या रसाने दात आणि दाढची माली केल्याने फायदा होतो. जर आपल्या दातांमध्ये वेदना होत असेल तर पेरूच्या झाडाची पानं पाण्यात उकळून घ्या. नंतर पाणी गाळून थंड करा, त्यात तुरटी मिसळून गुरळा केल्यानं दात दुखणं कमी होतं.
6) ब्रेनसाठी फायदेशीर
पेरुमध्ये व्हिटॅमिन B3 आणि B6 असते, ज्या कारणामुळे ब्लड सर्कुलेसन इम्प्रूव्ह होते. मेमोरी पाव्हर वाढते आणि नर्व्स रिलॅक्स होतात.
7) डोळ्यांचा प्रकाश वाढतो
पेरुमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ असते ज्या कारणामुळे हे डोळ्यांच्या प्रकाशासाठी बूस्टरचे काम करते. पेरु खाल्ल्याने फक्त आयसाइट चांगले होत नाही तर डोळ्यात होणा-या मोतिबिंदू आणि मस्कुलर डिकंजेशन सारख्या आजारांपासुन देखील वाचवते. पेरूमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ चे प्रमाण जास्त असते, जे डोळे निरोगी ठेवण्यात सक्षम ठरते. या व्यतिरिक्त पेरूमध्ये व्हिटॅमिन ‘सी’ भरपूर प्रमाणात असते, जे आजारांना दूर ठेवण्यास मदत करते.
8) वायरल दूर करते
दुस-या फळांच्या तुलनेत पेरुमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ‘सी’ आणि आयरन असते. हे दोन्हीही व्हायरल इन्फेक्शनपासुन वाचवतात. कच्च्या पेरुचा रस किंवा पेरुच्या पानांचा काढा फुफूसांमधील कफ बाहेर काढतो.
9) अँटी एजिंग प्रॉपर्टीज
पेरुमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त क्रोटेन आणि लायकोपेन सारखे अँटीऑक्सीडेंट्स तत्त्व असतात. हे स्किनला सुरकूत्या आणि फाइन लाइन्स पासुन वाचवतात.
10) रंग उजळवते
पेरू या फळात जीवनसत्व अ आणि क भरपूर प्रमाणात असतात. म्हणून हे फळ खाणे त्वचा आणि केस या दोहोंवरही चांगले परिणाम करते. फॉलिक अॅसिड, पोटॅशिअम, तांबे आणि मँगनीज हे धातू पेरूमध्ये मोठ्या प्रमाणात असतात. यामुळेच सौंदर्य प्रसाधने तयार करणाऱ्या अनेक कंपन्या पेरुचा वापर त्यांच्या उत्पादनात करतात.
पेरु त्वचेचा हरवलेला उजळपणा आणि ताजेपणा पुन्हा आणण्यास मदत करतो. पिकलेल्या पेरुचा गर चेह-यावर लावल्याने त्वचेसाठी नॅचरल स्क्रबचे काम करतात. हे डेड स्किनला काढता आणि तुमचा रंग उजळ करतात. पेरु व्हिटॅमिन ‘के’ चा चांगला स्त्रोत आहे ज्यामुळे स्किन डिस्कलरेशन, डार्क सर्कल्स, रेडनेस आणि पिंपल्स सारख्या समस्या दूर होतात. पेरूमध्ये पोटॅशियम तत्व असल्यामुळे याच्या सेवनाने त्वचा उजळते तसेच त्वचेवरील पुरळ, फोडं, काळे डाग दूर होतात.
काही लोक पेरू ठेचून त्यात थोडे मध घालून ते मिश्रण चेहऱ्यावर लावतात. त्वचेला यामुळे उजाळा येऊ शकतो.
पेरुंमध्ये ‘जीवनसत्व के’ मोठ्या प्रमाणावर असते. यामुळे त्वचेवर उमटणारे चट्टे, डोळ्यांभोवती येणारी काळी वर्तुळं यांवर ते उपाय करता येतात. पेरुचा गर नुसता शरीरावर लावल्यानेसुद्धा त्वचेतील अशुद्धी दूर होते. त्वचा नितळ होऊन तरुण आणि तेजस्वी दिसायला लागते. पेरू या फळात ८०% पाण्याचा समावेश असतो. हेच पाणी त्वचेतील ओलावा कायम ठेवण्यात मदत करते.
11) तोंड आले असेल तर
जर तुमचे तोंड आले असेल किंवा वारंवार तुम्हाला माउथ अल्सरची समस्या असेल तर पेरूची कोवळी ताजी पाने चावून-चावून खाल्ल्यास आराम मिळेल.
12) बॉडी फिट ठेवण्यासाठी
पेरूमधील पौष्टिक तत्व शरीराला फिट आणि फाईन ठेवण्यात मदत करतात, परंतु पेरू योग्य वेळेवर खावेत. रात्री पेरू खाल्ल्यास खोकला होण्याचा धोका राहतो.
व्हिटॅमिन सी -तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, पेरूमध्ये संत्र्यापेक्षा चारपट जास्त व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन ‘सी’मधील अँटी-ऑक्सीडेंट शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवतात आणि हे तत्त्व कॅन्सरशी लढण्यात सहायक ठरते.
पोटॅशियम
पेरूमध्ये असलेले पोटॅशियम तत्व शरीरातील सोडियमचा प्रभाव कमी करते. यामुळे ब्लडप्रेशर संतुलित राहते. तसेच कोलेस्ट्रॉलचा स्तरही कमी होतो.
13) थायरॉइड
चयापचय सुरळीत ठेवण्यात थायरॉइड ग्रंथीची महत्त्वाची भूमिका असते. पेरूमध्ये आयोडीनचे प्रमाण जास्त असते. यामुळे थायरॉइडच्या समस्येत आराम मिळतो. शरीराचे हार्मोनल संतुलन कायम राहते.
14) नशा कमी करण्यासाठी
एखाद्या व्यक्तीला दारू किंवा भांग जास्त झाल्यामुळे खूप नशा झाली असेल तर पेरूच्या पानांचा रस प्यायला दिल्यास नशा कमी होऊ शकते.
15) महिलांमधील फर्टिलिटी वाढवण्यासाठी
पेरूमध्ये फॉलेटचे प्रमाण जास्त असते. यामुळे महिलांमधील फर्टिलिटी वाढते. जर एखाद्या महिलेला आई होण्यात अडचण निर्माण होत असेल तर दररोज पेरूचे सेवन करावे.
थंडीच्या दिवसांमध्ये पेरू खाणं आरोग्यासाठी खूप फायद्याचं ठरू शकतं. पेरूमध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन असतात, जे शरीराला आरोग्यपू्र्ण राहण्याच मदत करते. पेरू हृदयासंबंधी आजारांवर खूप उपयुक्त ठरतात. हृदयासंबंधी आजारांमध्ये उपाय म्हणून पेरू महत्त्वपूर्ण ठरतात. जेवणासोबत पेरूची चटणी खाल्यानंतर आणि त्याचा मुरब्बा तीन महिने खाल्ला तर हृदयासंबंधी आजारांवर फायदा मिळतो. यानं रक्तासंबंध विकारही दूर होतात.
पेरू हे आपल्यातील अनेकांचं आवडतं फळ आहे. काहींना कडक तर काहींना अगदी पिकलेले पेरू खायला आवडतात. काहींना मात्र पेरू खाल्ल्यावर पोटदुखीचा त्रास होतो. हा त्रास खरं तर पेरूमुळे नाही, तर पेरुतील बियांमुळे होतो. ज्यांना हा त्रास होत असेल त्यांनी पेरुच्या बिया काढून केवळ मांसल भाग खाणे फायद्याचे ठरते.
आणखी काही फायदे
१)पोटात जळजळ, घसाकोरडापडणे, हात, पाय, डोळे ह्याची आग ह्यात जेवणानंतर १ तासाने पिकलेला पेरू खावा.
२)चालल्यावर थकवा येणे, पोटऱ्या दुखणे, घसा कोरडा पडणे ह्यावर सकाळी रिकामी पोटी १ पेरूचा गर+२ चमचे मध+१ चिमूट सैंधव हे मिश्रण घ्यावे.
३)संडासला साफ होत नसल्यास महिनाभर रोज रात्री एका पेरूचा गर खावा.
४)मोठ्या सर्जरी नंतर थकवा कमी करायला व जखम लवकर भरून यायला रोज १ पेरू+१ चमचा मध+१/२ चमचा साजुक तूप खावे.
५)लहान मुलांना पौष्टिक म्हणून खायला १ पेरूचा गर+ मध द्यावा. पेरू खायचा अतिरेक केल्यास सर्दी,पडसे होऊ शकते.
(सोशल मीडियावरून साभार)