आलेपाक सर्दी खोकल्यासाठी अत्यंत गुणकारी उपाय

आरोग्य

आलं: पाचक, सारक, अग्निदीपक, वेदनाशामक, कामोत्तेजक आणि रुचीप्रद आहे. वायू आणि कफाचा नाश करणारे आहे. आयुर्वेदानुसार शरीरात अनेक मार्ग आहेत ज्यांना स्त्रोतज म्हणतात. आल्यामुळे स्त्रोतजरोध दूर होतात.

आल्यामध्ये अनेक पोषक तत्वे असून ते आरोग्यवर्धक आहे आल्यामध्ये विटामिन बी-१२,कॅरोटीन,थायमिन,रीबोफ्लेवीन आणि क जीवनसत्व आहे. आले तिखट,उग्र चवीचे तसेच उष्ण आणि तीक्ष्ण गुणधर्मानी युक्त आहे. आल्याचा चहा पिणे आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे. थंडीच्या दिवसांत आलेपाक खाणे ही हितकारक असत. हा आलेपाक गूळ किंवा साखर घालून अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवता येतो. आलेपाक बनविताना त्यामध्ये गुळ, तूप, सुंठ, जिरे, काळी मिरी, नागकेसर, वेलची, दालचिनी, तमालपत्र, लवंग, धने पावडर, वावडिंग ही घालावे. त्यामुळे वडीची चव तर वाढतेच.शिवाय रोगांपासूनही रक्षण होते.

आल्याच्या वडीचे फायदे

१) पचनक्रिया सुरळीत होते.

२) घश्यातली खवखव, खोकला, सर्दी झाल्यास आराम मिळतो.

३) यात जिंजरोल असतं. त्यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो. हे खाल्ल्याने शरीरात अँटिऑक्सिडंट प्रभाव पडतो.

४) त्यामुळे चक्कर येणे, सकाळी थकवा येण्यापासून आराम मिळतो.

५)एका अभ्यानुसार, आल्यात वजन कमी करण्याची क्षमता असते. त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर नक्की आल्याच्या वड्या खाव्यात.

६) सांधेदुखी कमी होते.

७) त्यात मधुमेहविरोधी गुणधर्म आहेत. त्यामुळे आलेपाक खाल्याने शरीरातील साखरेची पातळी कमी होते.

८) आले खाल्ल्याने पोट लवकर साफ होते.

९) आले खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते,

१०) मेंदूचे आजार दीर्घकाळ जळजळीमुळे होतात आणि आल्यातील दाहक-विरोधी गुणधर्म मेंदूचे रोगांपासून संरक्षण करतात.

तर अश्या ह्या गुणकारी आल्याची अतिशय गुणकारी recipe म्हणजे आलेपाक

साहित्य

1)आलं :- आल्याचे तुकडे 1 कप

2) साखर /गुळ :- 1 कप

3) तूप :- एक ते दीड चमचा

4) वेलची पूड :- पाव चमचा

5) मीठ :- चिमूटभर

कृती

1) सर्वप्रथम आलं स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेणे

2) आल्याचे छोटे छोटे तुकडे करून ते मिक्सर मधुन फिरवून घ्यावे व त्यात एक कप साखर /गुळ घालून परत मिक्सर मधुन फिरवून बारीक paste करून घ्यावी.

3) आता एका कढईत 1 ते दीड चमचा तूप घालून त्यात ही paste घालून घ्यावी व mix करून घ्यावी व low ते medium-low flame वर हे मिश्रण सतत ढवळत रहावे.

4) मिश्रण घट्ट होत आलं की एका bowl मध्ये पाणी घेऊन त्यात ह्या मिश्राणाचा एक थेंब घालून कितपत घट्ट झालंय ते पाहावे. मिश्रणाची गोळी बनली की समजायचं की मिश्रण तयार आहे.

5) एका तूप लावलेल्या प्लेट मध्ये हे मिश्रण पसरवून घ्यावे व थोडे थंड होऊ द्यावे. 5-10 mins नंतर मिश्रण थोडे गरम असतानाच सुरीने आपल्याला हवा तसा आकार पाडून घ्यावा म्हणजे नंतर वड्या पडायला सोप्या पडतात.

6) आता ह्या वड्या 1-2 तास set होऊ द्याव्यात.

7) व खुसखुशीत आणि पौष्टिक आलेपाक तयार.

(सोशल मीडियावरुन साभार)