आरोग्यासाठी कडुलिंबाचा रस

आरोग्य

कडुलिंबाचे झाड आरोग्याचा खजिना आहे. याची पाने, फुले, रस, अगदी दात घासण्या पर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी वापर होतो. अनेक आजारांवर कडुलिंबाचा उपयोग केला जातो. आठवड्यातून एकदा कडुलिंबाचा रस पोटातील सर्व घाण, जंतू आणि विकार सहज बाहेर करण्याचा नैसर्गिक उपाय आहे.

कडुलिंबाचा रस: कडुलिंबाचे ताजे, स्वच्छ पाने धुवून मिक्सर मध्ये थोडे पाणी टाकून रस तयार करावा. हा रस गाळून घ्यावा म्हणजे प्यायला सोपा होईल. इच्छेनुसार त्यात थोडा मध किंवा लिंबाचा रस टाकल्यास त्याची कडवट चव कमी होते. आठवड्यातून एकदाच कडुलिंबाचा रस घ्यावा. सकाळी रिकाम्या पोटी ३० ते ५० मिली (सुमारे अर्धा ग्लास) रस घेणे उत्तम. यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात आणि पचनक्रिया सुधारते. पण हा रस दररोज घेऊ नये, कारण जास्त प्रमाणात घेतल्यास शरीरात उष्णता वाढू शकते.

होणारे फायदे: पोटातील जुनी घाण, जंतू आणि कृमी नैसर्गिकरीत्या बाहेर टाकले जातात. पचन सुधारते, भूक वाढवते आणि अपचन कमी होते. रक्तशुध्दीकरण करून त्वचेचे आजार, पिंपल्स, पुरळ कमी होतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्यामुळे लहानसहान आजारांपासून बचाव होतो. उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळतो आणि उष्मा कमी होतो.

घ्यावयाची काळजी: गर्भवती महिला, लहान मुले किंवा ज्यांना जास्त उष्णतेची तक्रार आहे, त्यांनी हा रस डॉक्टरांचा सल्ला न घेता पिऊ नये. योग्य प्रमाणात आणि योग्य पध्दतीने घेतल्यासच तो फायदेशीर ठरतो.

(सोशल मीडियावरून साभार)