जायफळ आरोग्यासाठी उपयुक्त 

आरोग्य

जायफळाचा वापर हा विविध मिठाईत केला जातो. मिठाईचा स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी त्याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. जायफळाची चव ही स्वादिष्ट तर असतेच, मात्र त्याच्या औषधीय गुणधर्मांसाठी आणि विविध फायद्यांसाठी ते अधिक ओळखले जाते.

इन्सोमनिया अर्थात निद्रानाशासाठी

इन्सोमनिया म्हणजे निद्रानाश या समस्येवर जायफळ प्रभावीपणे काम करते. निद्रनाश म्हणजे रात्री झोप न लागण्याची समस्या. दिवसभर काम, घर आणि बाहेरच्या गोष्टींमुळे तणावाची समस्या निर्माण होते, परिणामी झोप न येण्याची समस्या उद्भवते. अशा परिस्थितीत जायफळाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. याच्या प्रभावामुळे झोप न येण्याच्या समस्येवर मात करता येते. झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूधात चिमूटभर जायफळ मिसळून प्यायल्याने झोप चांगली लागते.

पचनक्रिया सुधारण्यासाठी

पचनक्रिया मंदावली असेल तर अन्नाचे चांगले पचन होण्यासाठी जायफळाचा वापर करावा. पचनक्रिया सुधारण्यासाठी तसेच, पोटाचे विकार जसे की, डायरिया, पित्त होणे इत्यादी समस्यांवर मात करण्यासाठी जायफळाचे सेवन करावे. यामुळे पचनक्रिया सुधारण्यात मदत होईल.

पेनकिलरच्या स्वरूपात

स्नायूंमध्ये वेदना होणे आणि ओटीपोटात दुखणे या समस्या दूर करण्यासाठी जायफळ फायदेशीर आहे. सांधे आणि स्नायूंच्या वेदनांसाठी जायफळ हा उत्तम पर्याय आहे. जायफळात असलेले अँटीऑक्सिडंट्स, अँटीइनफ्लेमेट्री गुण आणि औषधी गुणधर्म हे दुखण्यापासून आराम मिळवून देतात. तसेच स्नायू किंवा सांधेदुखीवर जायफळाच्या तेलाचा वापर करता येतो.

संधिवातासाठी लाभदायी

वाढत्या वयाबरोबर हाडे कमकुवत होतात. सांधेदुखीचा त्रासही होतो. अशा परिस्थितीत सुरुवाती पासूनच आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष द्यावे. संधिवात झाल्यावर शरिरावर सूज येणे आणि सांधे ठणकणे असा त्रास सुरू होतो. जायफळाचे सेवन केल्यास किंवा त्याचे तेल लावल्यास सांधेदुखीची सूज आणि वेदना दूर होतात. जायफळातील गुणधर्मांमुळे सांधेदुखी पासून आराम मिळतो.

कॅन्सर पासून बचाव करण्यास

कॅन्सर हा अतिशय घातक आजार आहे. हा धोका टाळण्यासाठी योग्य जीवनशैली आणि उत्तम आहार घेणे आवश्यक आहे. अनेकदा घरगुती उपायाने कर्करोगाचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकतो. जायफळात असलेले तेल अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करते आणि कर्करोग टाळू शकते. जायफळ त्याच्या अँटी-मायक्रोबियल गुणधर्मांमुळे पोटाच्या कर्करोगापासून संरक्षण करू शकते.

मधुमेहावर प्रभावी

मधूमेह हा एक सामान्य आजार आहे. केवळ वृध्दच नाही तर तरुण आणि लहान मुलेही या आजाराने त्रस्त आहेत. जायफळ हा ट्रायटेरपेन्सचा समृद्ध स्रोत आहे. ट्रायटरपेन्स मध्ये मधुमेहा विरोधी गुणधर्म असतात, जायफळ हे टाईप-2 मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करते.

निरोगी दातांसाठी

चांगल्या आरोग्यासाठी दातांची काळजी घेणे, गरजेचे आहे. जास्त साखर, सोडा किंवा कॉफीचे सेवन केल्याने दात किडणे आणि दातात पोकळी निर्माण होते. दातांच्या अनेक समस्यांसाठी जायफळ फायदेशीर ठरते. जायफळ हे अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्माने समृध्द आहे आणि हे दातांच्या आरोग्यासाठी लाभदायी आहे.

डोळ्यांसाठी फायदेशीर

डोळ्यांच्या चआरोग्यासाठी जायफळाचे सेवन करणे हे फायदेशीर ठरते. जायफळाचे सेवन केल्याने प्रोस्टाग्लॅंडि नावाच्या हार्मोनचे उत्पादन नियंत्रित करून डोळ्यांच्या समस्या कमी केल्या जाऊ शकतात.

तणाव दूर करण्यासाठी 

तणावामुळे अनेकांना पॅनिक अटॅकचा त्रास होतो. अशा परिस्थितीत जायफळ किंवा जायफळाच्या तेलाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. जायफळात अँटीकॉन्व्हलसंट गुणधर्म असतात, जे तणाव कमी करून मेंदूतील रक्ताभिसरणाची क्रिया सुधारते आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करते. रोगप्रतिकारक

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी 

आरोग्यासाठी रोगप्रतिकारशक्ती उत्तम असणे आवश्यक आहे. यासाठी जायफळाचे सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यात व्हिटॅमिन ए, सी आणि ई असते जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी

कॉलेस्ट्रॉलचे दोन प्रकार आहेत, चांगले कॉलेस्ट्रॉल आणि वाईट कॉलेस्ट्रॉल. जेव्हा शरिरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढू लागते, तेव्हा अनेक समस्या सुरू होतात. सतत थकवा जाणवणे, हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका, किडनीच्या समस्या, दृष्टी कमी होणे इत्यादी समस्यांचा सामना करावा लागतो. जायफळाचे सेवन केल्यास कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. त्यात असलेल्या इथॅनॉलिकचा अर्क कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. परंतु, जायफळाचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

वजन कमी करण्यासाठी

लठ्ठपणा ही जवळ जवळ प्रत्येकाची समस्या झाली आहे. तणाव, हार्मोनल असंतुलन, वारंवार बाहेरचे खाणे, अवेळी खाणे आणि शारिरिक व्यायामाचा अभाव ही त्यामागची कारणे आहेत. अशा स्थितीत वर्कआऊट्स आणि हेल्दी डाएट सोबतच जायफळचा वापर करावा. जायफळ वजन कमी करण्यात मदत करतो. याच्या सेवनाने वजन बऱ्याच अंशी कमी होऊ शकते.

जायफळाचा उपयोग अनेक प्रकारे कर येतो. जसे स्नायू आणि सांधेदुखीत गुडघ्यांना किंवा पायांना तेल लावून मसाज करावा. याचा मसाला म्हणून वापर केल्यास चवी सोबत आरोग्य चांगले राहते. जायफळाची चव ही तिखट आणि गरम असते. जर सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल, तर हा त्रास कमी करण्यासाठी जायफळाचे सेवन करावे. चिमूटभर जायफळाची पावडर दूधात मिसळून सेवन केल्याने शरीराला आतून उष्णता मिळते.

जायफळ त्वचेसाठीही फायदेशीर आहे. जर पिंपल्स किंवा डागांची समस्या असेल, तर जायफळ पावडर आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावा. हे मिश्रण कोरडे झाल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा. हा एक चांगला फेस पॅक आहे.

(सोशल मीडियावरून साभार)