लाल रंगाची फळ आणि भाज्या

आरोग्य

टॉमेटो मध्ये लायकोपिन मुबलक प्रमाणात असतं. लायकोपिन प्रोटेस्ट कॅन्सर, ओसोफेगस कॅन्सर आणि कोलोन कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर असतं.

स्ट्रॉबेरीतील पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन-सी इम्यून सिस्टीमसाठी फायदेशीर असतं.

चेरी मध्ये आढळून येणार एंथोसियानिन शरीराला फ्री रॅडिकल्स पासून होणाऱ्या नुकसानापासून वाचवते.

लाल राजमा शरीरासाठी लाभदायक असतो. यामध्ये फायबर आणि झिंक मोठ्या प्रमाणात असतं. जे हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर असतात.

बीट मध्ये फायबर, पोटॅशिअम, व्हिटॅमिन-सी, नायट्रेट आणि फोलेट मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत करते.

डाळिंब मध्ये असणारे अ‍ॅन्टी-ऑक्सिडंट प्रोस्टेट कॅन्सर पासून बचाव करण्यास मदत करतात.

सफरचंद मध्ये असणारी अ‍ॅन्टी ऑक्सिडंट कॅन्सर, डायबेटीज, हायपर टेन्शन आणि हृदयरोग यांसारख्या आजारांचा धोका कमी करतं.

(सोशल मीडियावरून साभार