1) केळीचे मूळ कापून त्याचा गर टाचावर १५ मिनिटे रगडावा. त्यानंतर टाचा स्वच्छ पाण्याने धुवाव्यात.
2) टाचांना भेगा पडलेल्या ठिकाणी रात्री ग्लिसरीन लावून पायमोजे घालून झोपावे. सकाळी उठल्यावर थंड पाण्याने पाय धुवावेत. कोमट पाण्यात व्हिनेगर घालून त्या पाण्यामध्ये पाय बुडवून ठेवावेे. त्यामुळे पायांच्या भेगा नाहीशा होऊन पाय नाजूक आणि उजळ होतील.
3) मधाच्या पोळ्यातील ताजे मेण काढून, वितळवून त्यात थोडी बोरीक पावडर मिसळून टाचांच्या भेगांवर लावल्यास चांगला परिणाम होतो.
4) आंघोळ झाल्यावर मोहरीच्या तेलामध्ये थोडी हळद घालून भेगांवर लावणेही फायदेशीर ठरते.
5) गरज नसेल तेव्हा पादत्राणे काढून ठेवावीत. ऑफिसमध्येही हाच नियम ठेवावा.
6) हिरव्यागार गवतावर चालणे हासुद्धा पायांच्या भेगा घालवण्यासाठी एक उत्तम उपाय आहे.
7) जेवणामधील जीवनसत्त्वांच्या अभावीही भेगा पडू शकतात. त्यामुळे जेवणात ई जीवनसत्त्व, कॅल्शिअम, लोह, झिंक यांसारख्या पोषक घटकांचा जरूर समावेश करावा.
8) राळेचे मलम (तेल, पाणी, व राळ यापासून करतात. हे मलम रात्री झोपताना व सकाळी उठल्यावर लावल्यास आराम मिळेल.)
(सोशल मीडियावरुन साभार)