स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही उपाय

आरोग्य

मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचे सेवन करण्यात येते. मात्र, ही औषधे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करवा. हे पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते.

भोपळ्याच्या बिया: भोपळ्याच्या बिया आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. या बियांचे नियमित सेवन केल्याने शरीर निरोगी राहते आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. भोपळ्याच्या बियात फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, विटामिन-सी इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळतात.

हळद: हळदीत अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. हळदीत आढळणारे कर्क्यूमिन मेंदूला तीक्ष्ण बनवतात. त्याच बरोबर हळदीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. हळदीच्या सेवनाने शरीर मोसमी आजारांपासून दूर राहते.

सुकामेवा: स्मरणशक्ती मजबूत करण्यासाठी सुक्यामेव्याचे सेवन करावे. कारण यात भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि आयरन आढळून येते, जे स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यास मदत करते. सुक्या मेव्याचे सेवन केल्याने लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदाम आणि अक्रोडाचे सेवन करू शकता.

ब्रोकोली: ब्रोकोली आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात फायबर, पोटॅशियम, आयरन, सोडियम यासारखे घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्याच बरोबर यात विटामिन-के आढळून येते, जे स्मरणशक्ती वाढवते.

(सोशल मीडियावरून साभार)