पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

आरोग्य

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे सुकण्यास अडचण येते, त्यामुळे बऱ्याचदा ओलसर कपडे वापरण्यात येतात. परंतु हे आरोग्यासाठी हानिकारक ठरते. कारण असे की, ओलसरपणा हे बुरशीचे प्रजननस्थळ आहे. येथे बुरशी अतिशय झपाट्याने वाढत असते. त्यामुळे पावसाळ्यात शक्यतो ओलसर कपड्यांमुळे फंगल इन्फेक्शनची समस्या जाणवते. हे इन्फेक्शन सामान्यतः त्वचा, केस, नखे तसेच तोंडाचा आतील भाग यावर बघण्यास मिळते.

फंगल इन्फेक्शन

बुरशीमुळे होणाऱ्या आजाराला फंगल इन्फेक्शन म्हणतात. ते कसे दिसते आणि ते तुमच्या शरीरावर कुठे आहे, यावरून डॉक्टर सहसा त्याचे निदान करू शकतात. बुरशीजन्य त्वचेच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी, अँटीफंगल औषधे घेणे गरजेचे ठरते.

पावसाळ्यात काळजी घ्या 

पावसाळ्यात घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. पावसाने कपडे ओलसर होणार नाहीत याची काळजी घ्या. पावसाळ्यातील थंड वातावरणामुळे ओठ निस्तेज आणि कोरडे पडू शकतात. अशा वेळी पावसाळ्यात ओठांवर लिप बाम लावावा. दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी घ्यावे. अति मेकअप करू नये. दिवसभरात दोन तीन वेळा चेहरा धुवा. त्वचा कोरडी ठेवा, पावसात भिजू नका. भिजल्यास अंग, केस चांगले कोरडे करा. ओले कपडे परिधान करू नये. आहार संतुलित असला पाहिजे. असे केल्यास त्वचेची योग्य प्रकारे काळजी राखली जाते.

संसर्गजन्य आजार

फंगल इन्फेक्शन हा संसर्गजन्य आजार आहे. तो कुटुंबात एकापासून दुसऱ्याला होऊ शकतो. त्यामुळे एकमेकांचे कपडे वापरू नये. रुग्णांचे कपडे वेगळे ठेवावे. फंगल इन्फेक्शनवरील उपचारांसाठी त्वचारोग तज्ञांचा सल्ला घ्यावा.

(सोशल मीडियावरून साभार)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत