हळद एक गुणकारी औषध…

आरोग्य

हळदीमुळे अन्नाला रूची तर येतेच, पण हळद हि आमदोष पचवण्याकरता मदत करते, जुलाब, याकरता हळद गुणकारी आहे. जंतावर ते एक प्रभावी औषध आहे. रोज सकाळी १/२ चमचा हळद व १/२ चमचा वावडिंग हे मिश्रण मधासोबत घेतले तर आणि शेवटि एंरडेल तेलाचा एनिमा घेतला तर संपूर्ण जंत निघून जातात.

अति रक्तस्राव होतो जेव्हा जखमेतून हळद दाबून ठेवली तर बंद होतो. संसर्ग न होता जखम पूर्ण बरि होते. डोळे येतात, तेव्हा हळदिच्या पाण्याने धुवावे. डोळ्यांचि आग, लालसरपणा, सूज, डोळ्यातून येणारा स्राव बंद होतो. शरिराच्या कुठल्याहि भागाला जर मूका मार लागला, पाय, हात लचकला, तर हळकुंड व आंबे हळद उगाळून लेप लावावा.

चेहर्यावर पिंपल, पुरळ, काळे डाग येत असल्यास, हळद व चंदन उगाळून लेप लावावा. भारतिय संस्क्रुतीत लग्नाच्या आधि वर वधुच्या अंगाला हळद लावण्याचा प्रघात आहे. म्हणून ऐरविसुद्धा साबण न वापरता। हळद+साय+ दहि+ मसूरिच्या डाळीचे पिठ या मिश्रणाने स्नान करावे कायम.

रोज रात्रि झोपण्यापूर्वि हळद गरम पाण्यातून घेतल्यास चरबि कमि होते. खोकला असतांना, कफ पडत नसेल तर, झोपण्यापूर्वी हळकुंडाचा तुकडा भाजून घेउन, चावून रस गिळावा. आराम होतो. स्रियांच्या डिलिव्हरिनंतर, गर्भाशय संकुचित होण्याकरता, गर्भाशयाचि ताकद वाढवण्याकरता, जंतु संसर्ग होउ नये यासाठी, बाळंतिणिच्या आहारात हळद समाविष्ट करतात.

कानांतून पाणि जात असेल तर, हळद. वावडिंग, वेखंड याची धुरि देतात अग्निमांद्य, झाल्यास, ओलि हळद, आले, लिंबूरस, व सैंधव मीठ, याचे लोणचे उपयुक्त आहे. मधुमेहि रूग्णांनि १/२ चमचा हळद, आवळयाचा रस, व मधासोबत घेतल्यास शुगर नियंत्रित राहते. तसेच पाव चमचा हळद, पाव चमचा दालचिनिचे चूर्ण, हापण उपचार आहे मधुमेहावर. वारंवार आवाज बसणे, घसा बसणे, कफाचि सर्दि यावर हळद+दूध कोमट करून पिणे. हळद भूक वाढवते, पोटातला अग्नि प्रज्वलित करते. हळदीत, करक्युमिन, रसायन असते जे कँसर रोगावर काम करते पेशिंचि वाढ बंद करते. गुडघेदुखि बंद करते. संधिवाताकरता खुप गुणकारि आहे.

(सोशल मीडियावरुन साभार)