पांढरा की गुलाबी पेरु कोणता चांगला आहे?

आरोग्य

गुलाबी की पांढरा पेरू खाणे, कोणत्या रंगाचा पेरू आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे, या प्रश्न तुमच्या मनातही आला असेल, तर त्याचे उत्तर गुलाबी आहे. होय, गुलाबी रंगाचा पेरू खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. अनेक अभ्यासांनी देखील पुष्टी केली आहे की आतून गुलाबी रंगाचा पेरू खाण्याचे फायदे सामान्य पेरूच्या तुलनेत अधिक आहेत. एका अभ्यासानुसार, गुलाबी पेरूचा वापर डेंग्यू बरा करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यात संत्र्यापेक्षा दुप्पट व्हिटॅमिन सी असते. जर तुम्हाला साखर किंवा स्टार्च कमी घ्यायचे असेल तर तुम्ही गुलाबी पेरू खाऊ शकता. कारण त्यात साखरेचे प्रमाण कमी असते.

पांढरा आणि गुलाबी पेरूमधला फरक

गुलाबी आणि पांढरा पेरूमधला सर्वात मोठा फरक म्हणजे रंग आणि चव आहे. जर आपण त्यांच्यामध्ये असलेल्या पोषक तत्वांबद्दल बोललो तर त्यांच्यामध्ये देखील खूप फरक आहे. गुलाबी पेरूमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक आणि साखर व स्टार्चचे प्रमाण कमी असते. याशिवाय गुलाबी पेरूमध्ये बियाही कमी असतात. पांढऱ्या पेरूमध्ये स्टार्च, साखर अधिक प्रमाणात आढळते आणि त्यात बियाही जास्त असतात. याशिवाय पांढऱ्या पेरूच्या गरामध्ये अँटी ऑक्सिडंटचे प्रमाणही आढळते.

(सोशल मीडियावरुन साभार)