केस गळतीवर घरगुती प्रभावी उपाय

आरोग्य

राेज काही केस गळणे हे सामान्य आहे, परंतु जेव्हा केस हे गुच्छांमध्ये गळणे सुरू होते, तेव्हा याचा अर्थ पोषक तत्वांची कमतरता किंवा अयोग्य जीवनशैली जसे कि जास्त ताण, अपुरी झोप किंवा धूम्रपान, मद्यपान यासारख्या सवयी असतात तसेच हार्मोनचे असंतुलकेस गळतीवरती घरगुती प्रभावी उपाय क्र. 1

राेज काही केस गळणे हे सामान्य आहे, परंतु जेव्हा केस हे गुच्छांमध्ये गळणे सुरू होते, तेव्हा याचा अर्थ पोषक तत्वांची कमतरता किंवा अयोग्य जीवनशैली जसे कि जास्त ताण, अपुरी झोप किंवा धूम्रपान, मद्यपान यासारख्या सवयी असतात तसेच हार्मोनचे असंतुलन देखील कारण असू शकते. बऱ्याच वेळा, आपल्या केसांची आणि त्वचेची स्थिती आपल्या आतील शरीराची स्थिती दर्शवते. म्हणूनच, केस गळती रोखण्यात पोषण महत्वाची भूमिका बजावते.

कढीपत्ता: हा भारतीय स्वयंपाकघरातील एक सामान्य मसाला आहे, जो आरोग्यासाठी विशेषतः केसांसाठी उत्तम आहे. कढीपत्ता हा बीटा-कॅरोटीन, प्रथिने, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि फॉस्फरसचा समृद्ध स्रोत आहे. कडीपत्त्यामुळे केस गळती रोखली जाऊन अकाली पांढरे होण्यापासून देखील त्यांचा बचाव होतो . केसांच्या आरोग्यासाठी कडीपत्त्याचा वापर आहारात तर महत्त्वाचा आहेच परंतु, त्याव्यतिरिक्त तुम्ही कडिपत्यांपासून खालीलप्रमाणे वेगवेगळे हेअर मासदेखील बनवून लावू शकता.

१) कढीपत्ता आणि दही हेअर मास्क: कढीपत्त्याची काही पाने वाटून घ्या. त्यात केसांच्या लांबीनुसार दही घाला व हा मास्क केसांना लावा हा मास्क २० ते ३० मिनिटे ठेवून केस धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा मास्क केसांना लावा.

२) कढीपत्ता कांदा हेअर मास्क: केसांच्या लांबीनुसार कढीपत्त्याची पाने आणि कांदा यांची पेस्ट करुन घ्यावी. तयार मास्क केसांना लावावा व साधारण ३० मिनिटांनंतर धुऊन टाकावा. तुम्हाला तुमचे केस मुलायम लागतील. जर कांद्यामुळे तुम्हाला तुमचे केस अधिक कोरडे वाटत असतील तर तुम्ही कांद्याचे त्यातील प्रमाण कमी करु शकता.

३) कढीपत्त्याचे तेल: कढीपत्त्याचे तेल बनवणे अगदी सोपे आहे. यासाठी तुम्हाला लागेल नारळाचे तेल. नारळाचे तेल गरम करुन घ्यावे. त्यात कढीपत्त्याची पाने टाकावीत व गॅस बंद करावा. नंतर तेलात मेथीचे दाने,जास्वंदाच्या पाकळ्या व एक चमचा अळीव टाकावे आणि मिश्रण रात्रभर तसेच ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी हे मिश्रण वस्त्रगाळ करून काचेच्या बाटलीत साठवावे. आठवड्यातून दोनदा हे तेल केसांना लावावे.१५ दिवसात तुमच्यात केसांमध्ये झालेला फरक जाणवेलन देखील कारण असू शकते. बऱ्याच वेळा, आपल्या केसांची आणि त्वचेची स्थिती आपल्या आतील शरीराची स्थिती दर्शवते. म्हणूनच, केस गळती रोखण्यात पोषण महत्वाची भूमिका बजावते.

कढीपत्ता: हा भारतीय स्वयंपाकघरातील एक सामान्य मसाला आहे, जो आरोग्यासाठी विशेषतः केसांसाठी उत्तम आहे. कढीपत्ता हा बीटा-कॅरोटीन, प्रथिने, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि फॉस्फरसचा समृद्ध स्रोत आहे. कडीपत्त्यामुळे केस गळती रोखली जाऊन अकाली पांढरे होण्यापासून देखील त्यांचा बचाव होतो . केसांच्या आरोग्यासाठी कडीपत्त्याचा वापर आहारात तर महत्त्वाचा आहेच परंतु, त्याव्यतिरिक्त तुम्ही कडिपत्यांपासून खालीलप्रमाणे वेगवेगळे हेअर मासदेखील बनवून लावू शकता.

१) कढीपत्ता आणि दही हेअर मास्क: कढीपत्त्याची काही पाने वाटून घ्या. त्यात केसांच्या लांबीनुसार दही घाला व हा मास्क केसांना लावा हा मास्क २० ते ३० मिनिटे ठेवून केस धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा मास्क केसांना लावा.

२) कढीपत्ता कांदा हेअर मास्क: केसांच्या लांबीनुसार कढीपत्त्याची पाने आणि कांदा यांची पेस्ट करुन घ्यावी. तयार मास्क केसांना लावावा व साधारण ३० मिनिटांनंतर धुऊन टाकावा. तुम्हाला तुमचे केस मुलायम लागतील. जर कांद्यामुळे तुम्हाला तुमचे केस अधिक कोरडे वाटत असतील तर तुम्ही कांद्याचे त्यातील प्रमाण कमी करु शकता.

३) कढीपत्त्याचे तेल: कढीपत्त्याचे तेल बनवणे अगदी सोपे आहे. यासाठी तुम्हाला लागेल नारळाचे तेल. नारळाचे तेल गरम करुन घ्यावे. त्यात कढीपत्त्याची पाने टाकावीत व गॅस बंद करावा. नंतर तेलात मेथीचे दाने,जास्वंदाच्या पाकळ्या व एक चमचा अळीव टाकावे आणि मिश्रण रात्रभर तसेच ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी हे मिश्रण वस्त्रगाळ करून काचेच्या बाटलीत साठवावे. आठवड्यातून दोनदा हे तेल केसांना लावावे.१५ दिवसात तुमच्यात केसांमध्ये झालेला फरक जाणवेल.

(सोशल मीडियावरुन साभार)