चामखीळ म्हणजे काय
चामखीळचा त्रास अनेकांना असतो. त्वचेवर चामखीळ होण्यासाठी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरल कारणीभूत असतो. ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसला HPV व्हायरस असेही म्हणतात. चामखीळला warts असे म्हणतात. चामखीळ हे शरीरासाठी फारसे धोकादायक नसतात. मात्र अंगावर चामखीळ असल्याने त्वचेच्या सौंदर्यावर थोडा परिणाम होऊ शकतो.
चामखीळ येण्याची कारणे
ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसमुळे (HPV व्हायरसमुळे) अंगावर चामखीळ येतात. शरीरावर असलेले चामखीळ नखाने कोचत राहणे यासारख्या सवयीमुळे चामखीळीतील स्त्राव शरीराच्या इतर ठिकाणीही लागण्याची शक्यता असते. त्यामुळे व्हायरसमुळे चामखीळ शरीराच्या इतर भागातही पसरत असतात. अशाप्रकारे शरीरावर चामखीळ येतात. यासाठी चामखीळ असल्यास त्यावर नखाने कोचत राहणे टाळावे.
तसेच चामखीळची लागण ही एकाकडून दुसऱ्याला होऊ शकते. यासाठी एकमेकांचे रेजर, अंतर्वस्त्रे, टॉवेल, कपडे, साबण, कंगवा इत्यादी वस्तू वापरणे टाळावे.
चामखीळचे प्रकार
चामखीळचे एकूण पाच प्रमुख प्रकार (types) असतात. प्रत्येक प्रकारचे चामखीळ शरीराच्या वेगवेगळ्या भागावर येत असतात तसेच त्यांचे स्वरूपही वेगवेगळे असते.
1) Common warts
2) Plantar warts
3) Flat warts
4) Filiform warts
5) Periungual warts
ह्या प्रकारचे चामखीळ शरीरावर कोठेही होऊ शकतात त्यातही बोटांवर अधिक प्रमाणात येतात.
2) Plantar warts: ह्या प्रकारचे चामखीळ पायाच्या तळव्यात येतात. इतर चामखीळ त्वचेच्या वर येत असतात तर या प्रकारातील चामखीळ पायाच्या तळव्याच्या त्वचेच्या आत येत असतात.
3) Flat warts: ह्या प्रकारचे चामखीळ चेहरा, हात आणि पायावर येतात.ह्या प्रकारचे चामखीळ नाक व तोंडाभोवती तसेच मानेवर आणि हनुवटीच्या खाली येतात.
4) Periungual warts: ह्या प्रकारचे चामखीळ नखांच्या आत येतात. यामुळे नखांच्या वाढीवर परिणाम होऊन त्या ठिकाणी वेदना होत असतात. चामखीळ ज्या HPV व्हायरसमुळे येतात त्या HPV व्हायरसचे 100 हून अधिक प्रकार आहेत. हातापायावर येणारे चामखीळ हे फारसे धोकादायक नसतात. मात्र काही वेळा गुप्तांगावरही चामखीळ येऊ शकतात. त्याला genital warts असे म्हणतात. स्त्रियांमध्ये गुप्तांगावर येणाऱ्या चामखीळमुळे गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्याचा धोका असतो.
कुठल्याही प्रकारचे बाह्य त्वचेवरील चामखीळीसाठी ऑपरेशन, जालीम उपाय यांची गरज पडत नाही. केवळ बारीक दोऱ्याने घट्ट बांधल्यास तेथील रक्ताभिसरण थांबून चार-पाच दिवसांत ते कडक होऊन गळून पडते.
(सोशल मीडियावरून साभार)