उचकीवर घरगुती उपाय…

आरोग्य

१) ताजे आल्याचे छोटे छोटे एक दोन तुकडे तोंडात धरले असता उचकी लगेच थांबते. थोडी साखर खावी म्हणजे उचकी जाईल.

२) ६ ग्रॅम बेहडा चूर्ण, ६ ग्रॅम मध एकत्र करुन जर खूपच सारखी सारखी उचकी लागत असेल तर दोन तासाच्या अंतराने हे चूर्ण चाटावे.

३) १ चमचा (छोटा) तुळशीच्या रसात, अर्धा छोटा चमचा मध घालून मिश्रण चाटले असता उचकी थांबते.

४) अपचनाने येणाऱ्या उचकीवर मिरी जाळून तिचा धूर हुंगावा. लहान मुलांना उचकी लागली की त्यांची भूक वाढली समजून किंचित मध चाटवावा.

५) मूळ्याची पाने चावून खा म्हणजे उचकी लगेच थांबेल. छोटा वेलदोडा तोंडात धरा अन पहा उचकी थांबते की नाही.

६) पुदिन्याची पाने स्वच्छ धुऊन तोंडात धरली असता उचकी लगेचच थांबते. बडिशेप दाताने चावून खा मग लगेच उचकी थांबेल. दीर्घ श्वसनानेही उचकी थांबते.

(सोशल मीडियावरून साभार)