लसूण तुपात फ्राय करून खाण्याचे काय आहेत फायदे

आरोग्य

तूप आणि लसणाचं कसं कराल सेवन?

आयुर्वेदात तर तूप आणि लसणाच्या एकत्र सेवनाला खूप महत्व आहे. याचं सेवन करण्यासाठी रात्री लसूण सोलून ठेवा आणि सकाळी तुपात फ्राय करून याचं सेवन करा. तुपात फ्राय केल्यावर याची टेस्ट आणि गुणधर्म दोन्ही बदलतात. चला जाणून घेऊ यांचं एकत्र सेवन केल्याने काय काय फायदे मिळतात.

स्ट्रोकचा धोका कमी होतो

लसूण तुपात फ्राय करून सेवन केल्याने ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी केला जाऊ शकतो. त्यासोबतच याने ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासही मदत मिळते.

इम्यूनिटी बूस्ट होते

जे लोक नेहमीच आजारी पडतात किंवा ज्यांना सतत सर्दी-खोकला होत असेल त्यांची इम्यूनिटी कमजोर असते. अशात ज्यांची इम्यूनिटी कमजोर आहे त्यांनी रोज तुपात फ्राय केलेल्या लसणाचं सेवन केलं पाहिजे. याने इम्यूनिटी बूस्ट होते.

ऑटो इम्यून डिजीजपासून बचाव

लसूण तुपात फ्राय करून खाल्ल्यास ऑटो इम्यून डिजीज जसे की, संधिवात, ल्यूपस, मल्टीपल स्केलेरोसिस आणि क्रॉनिक सूज समस्यांपासून बचाव केला जाऊ शकतो.

बॉडी डिटॉक्स

लसणांमध्ये असे अनेक पोषक तत्व जसे की, एलिसिन आणि सॅपोनिन आढळतात. जे अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. या तत्वांमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत मिळते.

(सोशल मीडियावरून साभार)