राज्यात १८,००० कंत्राटी शिक्षकांची भरती होणार

महाराष्ट्र

औरंगाबाद: राज्यातील शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल होणार असून सुमारे १८ हजार १०६ कमी पटाच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नेमण्याची मोठी प्रक्रिया सुरू होणार आहे जिल्हा परिषदेच्या कमी पटाच्या शाळांवर याचा थेट परिणाम होणार आहे

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

५२ वर्षे वयापर्यंतच्या प्राथमिक शिक्षकांनी दोन वर्षांत TET उत्तीर्ण करणे आवश्यक

२३ नोव्हेंबरला झालेली TET ही पहिली संधी

अनेक शिक्षकांनी हा निर्णय रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू केले

शासन निर्णय मान्य झाल्याने हजारो शिक्षकांना अतिरिक्त होण्याची भीती

माध्यमिक शाळांसाठी मोठा निर्णय

नववी-दहावीमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थी असलेले वर्ग ओळखले जात आहेत

त्या वर्गातील शिक्षक अतिरिक्त घोषित होण्याची शक्यता

5 डिसेंबरपर्यंत समायोजनाची मुदत

सुमारे ६२० शाळांमधील ३,००० शिक्षकांचे दुसरीकडे समायोजन

जिल्हा परिषद शाळांची स्थिती

एकूण शाळा ६४,०००

दहा पेक्षा कमी पटाच्या शाळा ८,०८९

२० पेक्षा कमी पटाच्या शाळा १८,१०६

कंत्राटी शिक्षकांची नियोजन संख्या १८,१०६

कंत्राटी नियुक्ती कशी होणार

दहा पेक्षा कमी पटाच्या प्रत्येक शाळेत १ कंत्राटी शिक्षक

२० पेक्षा कमी पटाच्या शाळेत १ नियमित + १ कंत्राटी शिक्षक

त्यानुसार नियुक्ती प्रक्रिया राबवली जाणार

माध्यमिक ५ ते ८ वर्गांचे काय

पाचवी ते आठवीच्या वर्गांवर कमी पट असलेल्या माध्यमिक शाळांमध्येही समस्या

नियमित शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता

त्या जागी कंत्राटी शिक्षक नेमण्याची तयारी

शिक्षण विभागाकडून अद्याप अंतिम निर्णय बाकी

परिणाम कोणावर होणार

प्राथमिक शिक्षक

माध्यमिक शिक्षक

कमी पटाच्या ग्रामीण शाळा

अनुदानित शाळा

शिक्षक समायोजन प्रक्रिया