अजितदादांच्या जाण्याने माझे वैयक्तिक नुकसान; डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडून शोक व्यक्त

महाराष्ट्र

मुंबई: महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाची बातमी ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी तसेच कदम कुटुंबासाठी अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. अजितदादांच्या जाण्याने राज्याने एक खंबीर, अनुभवी आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व गमावले आहे.

गेल्या सुमारे ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात त्यांनी आपल्या प्रशासकीय अभ्यास, ठाम निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुणांच्या बळावर महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळे वलय निर्माण केले होते. त्यांचे कार्य, योगदान आणि नेतृत्व सदैव स्मरणात राहील.

भारती विद्यापीठ तसेच समस्त सांगली जिल्ह्याच्या वतीने डॉ. विश्वजीत कदम यांनी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून, त्यांच्या निधनाने आपले वैयक्तिक नुकसान झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.ही दुःखद बातमी समजताच डॉ. विश्वजीत कदम हे बारामतीकडे रवाना झाले असून, ते पवार कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणार आहेत.