अजित पवार यांच्यासह माजी सदस्यांवरील शोकप्रस्ताव; दुःख एका पक्षाचे नसते, सभागृहात भावनिक वातावरण

मुंबई: महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सुरुवात भावनिक वातावरणात झाली. प्रथेनुसार पहिल्याच दिवशी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करत शोकप्रस्ताव मांडण्यात आला. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित अनंतराव पवार यांच्यासह माजी मंत्री सुरुपसिंग नाईक , माजी विधान परिषद सदस्य अशोक मोदक , गंगाधर पाटणे आणि नीला देसाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. विधान परिषदेच्या […]

अधिक वाचा..

कोणत्याही अडचणीत मी तुमच्या सोबत! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विदीप जाधव कुटुंबियांना भावनिक सांत्वन

सातारा: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सुरक्षारक्षक स्वर्गीय विदीप जाधव यांचा बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुःखद घटनेनंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्वतःच्या वैयक्तिक दुःखाला बाजूला ठेवत विदीप जाधव यांच्या तरडगाव (ता. फलटण) येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी स्वर्गीय विदीप जाधव यांच्या पत्नी व […]

अधिक वाचा..

लाडक्या लोकनेत्याला सहकार क्षेत्राचा सलाम; विकासाचे शिल्पकार अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली

शोकसभेत आठवणींच्या भावनांचा फुटला बांध शिरूर (सुनिल जिते): उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी रविवार (ता.०१) शिरूर येथे शोकसभा पार पडली.शिरूरच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्राने एक कर्तबगार, दूरदृष्टी असलेला आणि जनतेसाठी अखंड झटणारा नेता गमावला असून शिरूरसाठी ही हानी असल्याची भावना शिरूर गटसचिवाच्या वतीने व्यक्त […]

अधिक वाचा..

अजितदादांच्या जाण्याने माझे वैयक्तिक नुकसान; डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडून शोक व्यक्त

मुंबई: महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाची बातमी ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी तसेच कदम कुटुंबासाठी अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. अजितदादांच्या जाण्याने राज्याने एक खंबीर, अनुभवी आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व गमावले आहे. गेल्या सुमारे ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात त्यांनी आपल्या प्रशासकीय अभ्यास, ठाम निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुणांच्या बळावर महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळे […]

अधिक वाचा..

कुंडेश्वर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांची सांत्वनपर भेट, तर जखमींची नीलम गोऱ्हे यांनी घेतली भेट

पुणे: खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे दर्शनाला जात असताना सोमवारी दुपारी एकच्या सुमारास पिकअप दरीत कोसळून भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत १२ महिला भाविकांचा मृत्यू झाला तर २० पेक्षा अधिक महिला व लहान मुले जखमी झाले. या हृदयद्रावक घटनेनंतर विधानपरिषद उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्यक्ष भेटून सांत्वन केले, तसेच जखमींची […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारच्या संवेदना बोथट; अजित पवार

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन विरोधी पक्षांनी केला सभात्याग… मुंबई: अवकाळी पाऊस, गारपीटीने राज्यातील शेतकरी अडचणीत असताना मुख्यमंत्री धुळवड खेळण्यात दंग होते असा थेट आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. नाफेडकडून अजूनही शेतमाल खरेदी सुरु नाही, सरकारकडून सभागृहाची दिशाभूल करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकारच्या संवेदना बोथट झाल्या आहेत असा आरोप करत शेतकऱ्यांच्या […]

अधिक वाचा..

मराठी चित्रपट निर्माते कॅप्टन कल्पेश मगर यांना पितृशोक…

मुंबई: नुकताच येऊन गेलेल्या ‘वऱ्हाडी वाजंत्री’ या चित्रपटाचे निर्माते कॅप्टन कल्पेश मगर यांचे वडील रविंद्र हरिभाऊ मगर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने मुंबईत निधन झाले आहे. गेली काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर कांदिवली येथील ‘विन्स हॉस्पिटल’मध्ये उपचार सुरु होते. प्रकृतीत सुधारणा जाणवल्याने त्यांना घरी नेण्यात आले होते. मात्र काही दिवसांत पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर २ […]

अधिक वाचा..