Skip to content
गुरूवार, जुलै 23, 2026
  • शिरुर तालुक्यातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक – तेजस फडके 9766117755 / 9423020103
Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

shirurtaluka.com : shirur taluka news

  • शिरूर तालुका
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • देश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • खव्वयेगिरी
  • थेट गावातून
  • मुलाखत
  • भविष्य
  • खूप काही+
    • आजचा वाढदिवस
    • आरोग्य
    • इतर
site mode button

रेल्वेच्या सर्व डब्यात मेट्रोसारखे एसी असणार, तिकीटदरातही वाढ नाही; मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा

महाराष्ट्र
जुलै 19, 2025जुलै 19, 2025शिरूर तालुका टीम

मुंबई: मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. लवकरच मुंबई लोकल ट्रेनमध्ये मेट्रोसारखे एसी कोचेस उपलब्ध होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. प्रवाशांना या सुविधासाठी तिकीट दरात वाढ होणार नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. या एसी कोचेसमध्ये बंद होणारे दरवाजे असतील. हे कोचेस पूर्णपणे नवे असतील, यात रेट्रोफिटिंग नसेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये फडणवीस बोलत होते.

मुंब्रा येथे मोठी रेल्वे दुर्घटना झाली होती. लोकल ट्रेनला दरवाजे नसल्याने अपघात होत असल्याचे पाहायला मिळत आहे. लोक दाटीवाटीने प्रवास करत आहेत. आज दोन क्लास तयार करण्यात आले आहेत. मेट्रो ही पूर्णपणे वातानुकूलित आहे, शिवाय त्याचे दरवाजे बंद होतात. एसीमुळे प्रवाशांचा प्रवास सुखदायी होतो. एका बाजूला मेट्रो आहे, तर दुसऱ्या बाजूला लोकल रेल्वे आहे. लोक गर्दीत प्रवास करतात, लोकल ट्रेनच्या डब्यांना दरवाजे नसल्याने अपघात होतात, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे लोकल रेल्वेमधील सुधारणेसाठी मागणी केली आहे. रेल्वेला मेट्रोसारखे एसी कोचेस मिळावेत. एसी कोचेसना बंद होणार दरवाजे असावेत. यामुळे तिकीटदरात एका रुपयाचीही वाढ होऊ नये अशी मागणी आम्ही केली आहे. याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून यासंदर्भात लवकरच घोषणा केली जाईल, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले.

लवकरच मुंबईतील लोकल रेल्वेचे डबे मेट्रोसारखे वातानुकूलित असतील हे डबे रेट्रोफिटिंग नसून नवे डबे असतील. उत्कृष्ट पद्धतीचे हे डबे, कोचेस असतील. आगामी काळात लोकल ट्रेनला बंद होणारे दरवाजे असतील. पण तिकिटात कोणत्याही प्रकारची दरवाढ होणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. याशिवाय त्यांनी मेट्रो प्रकल्पांवरही भाष्य केले आहे. कुलाबा ते आरे मार्ग ऑक्टोबर २०२५ च्या अखेरीस पूर्णतः कार्यान्वित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. विक्रोळी-मंडाले आणि ठाणे-कल्याणसह १३ मेट्रो मार्गांवर काम वेगाने सुरू आहे. एकात्मिक तिकीट प्रणालीही लवकरच लागू होणार आहे. या प्रणालीमुळे एकाच तिकीटावर मेट्रो, लोकल, मोनो, बेस्ट आणि जलवाहतूक या सर्व सेवा वापरता येणार आहेत. हे तिकीट व्हॉट्सअ‍ॅपवरही उपलब्ध होणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Tagged AC likeAll railwayCmcoachesMetrono increaseticket prices

पोस्टचे नॅव्हिगेशन

संभाजी भिडेंनी फोडलं नव्या वादाला तोंड; म्हणाले
मी कोणाला छेडत नाही पण मला छेडलं तर कोणाला सोडत नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संबंधित पोस्ट

मराठी भाषा गौरव दिनी ‘पप्पा सांगा कुणाचे…’ माहितीपटाचे विशेष प्रदर्शन

फेब्रुवारी 28, 2026शिरूर तालुका टीम

शासणाच्या आडमुठ्या व जाचक अटींमुळे विहीरीच्या अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित

डिसेंबर 30, 2022डिसेंबर 30, 2022शिरूर तालुका टीम

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मे 1, 2026शिरूर तालुका टीम

अलीकडील पोस्ट

  • शिरूर तालुक्यात हॉटेलसमोर तरुणाला काठ्यांनी मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल…
  • दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ
  • भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…
  • शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…
  • विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

Popular Categories

  • आरोग्य (2,302)
  • इतर (154)
  • क्राईम (1,692)
  • खव्वयेगिरी (4)
  • थेट गावातून (18)
  • देश (46)
  • भविष्य (366)
  • मनोरंजन (168)
  • महाराष्ट्र (5,104)
  • मुख्य बातम्या (2,170)
  • मुलाखत (23)
  • राजकीय (973)
  • शिरूर तालुका (2,843)

आजचा प्रश्न

शिरूर तालुक्यात निवडणूकीदरम्यान पैसा आणि ड्रग्जचा वापर झाला आहे, असे आपणास वाटते काय?

View Results

Loading ... Loading ...
  • Polls Archive

शिरुरतालुका बद्दल

शिरूर तालका डॉट कॉम बद्दल थोडक्यात... www.shirurtaluka.com या वेबसाईटचे उद्घाटन २०११ रोजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात झाले आहे. राज्यातील पहिली तालुक्याची वेबसाईट असून, शिरूर तालुक्यातील प्रत्येक घडामोड वेबसाईटवर वाचायला मिळते.

FOLLOW US

काही निवडक श्रेणी

  • शिरूर तालुका
  • थेट गावातून
  • क्राईम
  • राजकीय
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • देश
  • मुलाखत

ताज्या घडामोडी

  • शिरूर तालुक्यात हॉटेलसमोर तरुणाला काठ्यांनी मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल…
  • दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ
  • भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…
  • शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…
  • विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

Like Us On Facebook

Loading...
© 2022 ShirurTaluka.com. All Rights Reserved. | Theme: News Portal by Mystery Themes.
error: Content is protected !!