मुंबई: जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करावा लागेल. लर्निंग लायसन्सनंतर पर्मनंट लायसन्स मिळते. जर तुम्हाला लर्निंग लायसन्सची प्रक्रिया माहित नसेल, तर आज आम्ही तुम्हाला त्याची ऑनलाइन प्रक्रिया सांगणार आहोत. लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स (LLR) साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
1) sarathi.parivahan.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
2) “ऑनलाइन सेवा” या पर्यायावर क्लिक करा.
3) लर्निंग लायसन्स” च्या लिंकवर क्लिक करा.
4) यानंतर तुमचे राज्य निवडा.
5) यानंतर “अर्जदार” या पर्यायावर क्लिक करा.
6) आता तुमचा आधार कार्ड नंबर आणि आधार लिंक असलेला मोबाईल नंबर टाका.
7) आता “जनरेट ओटीपी” वर क्लिक करा.
8) आता तुमच्या मोबाईलवर आलेला OTP एंटर करा.
9) यानंतर “सबमिट” या पर्यायावर क्लिक करा.
वरील सर्व प्रक्रिया केल्यावर आता तुम्हाला एक अर्ज भरावा लागेल.
त्या अर्जामध्ये तुमची सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, पत्ता आणि इतर आवश्यक माहिती भरा.
आता तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
त्यानंतर “फी” या पर्यायावर क्लिक करून तुमच्या राज्य सरकारने ठरवून दिलेली फी भरा.
आता “सबमिट” या पर्यायावर क्लिक करा.
आता तुमचा अर्ज सबमिट झाला आहे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती ऑनलाइन ट्रॅक करू शकता.
लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
आधारकार्ड
मतदानकार्ड
रहिवासी दाखला
जन्मतारीख प्रमाणपत्र (दहावी मार्कशीट, जन्म प्रमाणपत्र, ओळखपत्र)
पॅनकार्ड
रेशनकार्ड
वीज बिल
पासपोर्ट फोटो
स्वाक्षरी
मोबाईल क्रमांक
लक्षात ठेवा
तुमचा लर्निंग लायसन्स या प्रक्रियेद्वारे अर्ज केल्यानंतर सुमारे 7 दिवसांच्या आत तुमच्या घरच्या पत्त्यावर लर्निंग लायसन्स पोहोच होईल. मात्र कायमस्वरूपी परवाना घ्यायचा असेल तर आरटीओ कार्यालयात जावे लागेल.