राष्ट्रवादी विलीनीकरणावर ब्रेक! जयंत पाटील यांचे सूचक वक्तव्य; शिंदेंची स्पष्ट भूमिका

महाराष्ट्र

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा वेगाने पुढे सरकत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. अजित पवारांची इच्छा दोन्ही गट एकत्र यावेत, अशी होती आणि त्यासाठी त्यांनी काही बैठका घेतल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला होता.

मात्र या चर्चेला आता अचानक ब्रेक लागल्याचे दिसत आहे. अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी विलीनीकरणाबाबत आक्षेप घेतल्याने चर्चेची दिशा बदलली आहे.

जयंत पाटील यांचे सूचक विधान

राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे नेते जयंत पाटील यांनी विलीनीकरणावर भाष्य करताना महत्त्वाचे संकेत दिले. बारामतीत आम्ही चार-पाच जणांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. “काही मदत लागली तर सांगा, कोणताही किंतू मनात ठेवू नका,” असे आम्ही त्यांना सांगितले, असे जयंत पाटील म्हणाले.

तसेच पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या राजकीय वाटचालीत अडथळे निर्माण करण्याची आमची इच्छा नाही, आम्ही त्यांच्यासाठी सपोर्टिव्ह आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.या वक्तव्यामुळे भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत नवे तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

शिंदेंची स्पष्ट भूमिका

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष Shashikant Shinde यांनी विलीनीकरणाची चर्चा तूर्तास बंद करत असल्याचे जाहीर केले आहे. तटकरे आणि पटेल यांच्या भूमिकेनंतर शिंदेंनीही माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रश्न कायम

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार का? की सध्याचे राजकीय अंतर कायम राहणार?

विलीनीकरणावर सध्या अनिश्चिततेचे सावट असून आगामी काळात या मुद्द्यावर आणखी राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे.