मुंबई विद्यापीठाचे निकाल वेळेवर लवण्यासंदर्भात जबाबदारी निश्चित करा; बाळासाहेब थोरात 

महाराष्ट्र

मुंबई: मुंबई विद्यापीठाचे विविध विषयांचे निकाल उशिरा लागतात, काही परीक्षांचे निकाल हे लागून गेले आहेत पण अजूनही विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देण्यात आलेले नाहीत, या मुळे होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी कोणाची, हे निश्चित केले पाहिजे, अशा शब्दात विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारला घेरले, त्यावर अध्यक्षांनी या संदर्भात उचित जबाबदारी निश्चित करण्याचे सरकारला निर्देशित केले.

थोरात म्हणाले, अहवालावर चर्चा करता येत नाही हे मला माहीत आहे, परंतु आपण २०१३ नंतरचे अहवाल एकत्रित देत आहात, मुंबई विद्यापीठाचे विविध निकाल कधीच वेळेवर लागत नाही, त्यातून विद्यार्थ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो, विद्यार्थी आंदोलन करतो, हे राज्याला शोभणारे नाही.

बीपीएड कोर्स पूर्ण झाला, परीक्षा झाल्या, निकाल लागले पण अजून डिग्री सर्टिफिकेट देण्यात आलेले नाही. मार्कशीट देखील देण्यात आलेली नाही त्यामुळे टेम्पररी डिग्री सर्टिफिकेट जे मार्कशीट सोबत मिळते तेही देण्यात आलेले नाही. परिणाम असा होतो की, विद्यार्थ्यांनी कोर्स पूर्ण करून देखील त्यांना नोकरीसाठी अर्ज करणे किंवा पुढील शिक्षणाकरिता जाणे शक्य होत नाहीये.