एक वर्षाचं बाळ कडेवर घेऊन रिक्षा चालवणारी दुर्गा…

महाराष्ट्र

नाशिक: तुम्ही जो फोटो पाहताय त्यात बाळाला समोर बांधून रिक्षा चालवताना जी दिसतेय, त्या महिलेच नाव चंचल शर्मा आहे.

बाळाला तिने कडेवर घेऊन गच्च बांधून ती ई-रिक्षा चालवते. घर चालवण्यासाठी असं करण्याशिवाय दुसरा पर्याय तिच्याजवळ नाही. नवरा छळायचा. अखेर एक दिवस तान्ह्या बाळासह बायकोलाही तो सोडून गेला.

पदरात असलेलं एक वर्षाचं बाळ सांभाळयचं कसं? पैसे कुठून कमावणार? काय काम करणार? अनेक प्रश्न चंचलसमोर अचानक उभे ठाकले. पण तिनं हार मानली नाही. जगण्यासाठी संघर्ष करायच तिन ठरवल. चंचल कामाच्या शोधात होती.

नवरा सोडून गेल्यानं खायचे वांदे झाले होते. पण काम करायचं म्हटलं तर मुलाकडे लक्ष देता येणार नाही. पण मुलाला मोठं करायचं, तर काम करावच लागणार. त्याला चांगलं भविष्य द्यायचं असेल तर पैसे कमवावेच लागणार. त्यासाठी अखेर तिनं मुलाला समोर बांधलं. रिक्षा चालवायचं ठरवलं. चिमुरड्याला सोबत घेऊन काम करत जगण्याचा संघर्ष करणारी चंचलची कहाणी अनेकांना प्रेरणा देत आहे.