शेवटी मी चळवळीतील नेता, पाटलांच्या पाया पडलो कारण..

महाराष्ट्र राजकीय

मुंबई: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा आठवड्यातील तेरावा दिवस असून इतक्या दिवसांची चर्चा आणि त्यानंतर आता मिळालेली नवीन जबाबदारी याबद्दल आई महाराष्ट्राची संवाद साधताना नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले की, माझी निवड केल्याबद्दल पक्षाचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि पक्षाच्या सर्व नेत्यांचे आभार.

निवड झाली म्हणजे जबाबदारी सुद्धा वाढल्याची जाणीव मला आहे. सध्याच्या घडीला दोन महिन्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असणार आहेत. पक्षाचे उभारी घेऊन पक्ष मजबूतपणे उभा करून येणाऱ्या निवडणुकीला कशाप्रकारे उभं राहायचं आणि यशस्वी व्हायचं याच्या संदर्भातील काम निश्चितपणे करावं लागेल.

नवीन पदी विराजमान झाल्यानंतर शशिकांत शिंदे हे आंदोलनात सहभागी होताना पाहायला मिळाले. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, मी चळवळीतील नेता आहे. म्हणूनच माझी निवड या पदासाठी करण्यात आली आहे. लोकांच्या प्रश्नासाठी आणि वेळ पडली तर चुकीच्या कामासाठी प्रतिनिधीला जबाबदार ठरवून जाब विचारणं आणि जनतेपर्यंत ते पोहोचवण्याचं काम असल्यामुळे मी आंदोलनात सहभागी झालो होतो, असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

यापुढे पक्षांतर्गत कामांबाबत तुमची भूमिका काय असेल असा प्रश्न विचारण्यात आल्यावर शशिकांत शिंदे म्हणाले की, आता अधिवेशनानंतर आम्ही बैठक घेणार आहोत आणि त्यामध्ये पुढील निर्णय घेण्यात येतील. काही चर्चा करण्यात येतील आणि मगच पुढची भूमिका ठरवण्यात येईल. महाराष्ट्र दौरा केल्यानंतर आणि राज्यातील जिल्ह्यांच्या प्रमुखांना भेटल्यानंतर काम करता येईल. यासोबतच, त्यांना विचारण्यात आले की सध्या त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुभेच्छा दिल्यानंतर त्यांच्या ते पाया पडले आहेत. याबाबत ते म्हणाले की, पाया पडणे ही आपली संस्कृती आहे. मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो. जयंत पाटील असो किंवा पक्षातील इतर वरिष्ठ नेते मी काम करताना सर्वांचा आदर करतो. येणाऱ्या पुढील काळात सर्वांशी चर्चा करून मी माझं काम करणार असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा आठवड्यातील तेरावा दिवस असून या दिवशी नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी टाईम महाराष्ट्रशी संवाद साधला. इतक्या दिवसांची चर्चा आणि त्यानंतर आता मिळालेली नवीन जबाबदारी याबद्दल आई महाराष्ट्राची संवाद साधताना नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले की, माझी निवड केल्याबद्दल पक्षाचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि पक्षाच्या सर्व नेत्यांचे आभार. निवड झाली म्हणजे जबाबदारी सुद्धा वाढल्याची जाणीव मला आहे. सध्याच्या घडीला दोन महिन्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असणार आहेत. पक्षाचे उभारी घेऊन पक्ष मजबूतपणे उभा करून येणाऱ्या निवडणुकीला कशाप्रकारे उभं राहायचं आणि यशस्वी व्हायचं याच्या संदर्भातील काम निश्चितपणे करावं लागेल.