मुलांच्या मोफत शिक्षणासाठी RTE अंतर्गत मोफत प्रवेशाला सुरुवात; असा करा ऑनलाइन अर्ज

महाराष्ट्र

मुंबई: बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५% राखीव जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०२५ आहे.

अर्जासाठी पात्र शाळा:

स्वयंअर्थसहाय्यित शाळा

विनाअनुदानित शाळा

पोलिस कल्याणकारी शाळा

महानगरपालिका (स्वयंअर्थसहाय्यित) शाळा

ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया

पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर जाऊन आवश्यक माहिती भरावी. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.

आरटीई प्रवेशासाठी पात्रता:

अनुसूचित जाती (SC)

अनुसूचित जमाती (ST)

विमुक्त जाती (VJ)

भटक्या जाती (NT)

इतर मागासवर्ग (OBC)

विशेष मागासवर्ग (SBC)

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक

सामाजिकदृष्ट्या मागास घटक

अनाथ बालके

एचआयव्ही बाधित/प्रभावित बालके

दिव्यांग बालके

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:

बालकाचे ओळखपत्र (आधार कार्ड किंवा जन्म प्रमाणपत्र)

पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र

निवासी प्रमाणपत्र

जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

बालक दिव्यांग असल्यास त्याचा प्रमाणपत्र

इतर आवश्यक कागदपत्रे

महत्त्वाच्या तारखा

अर्जाची सुरुवात: १४ जानेवारी २०२५

अर्जाची शेवटची तारीख: २७ जानेवारी २०२५

लक्षात ठेवा

अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.  कागदपत्रांची पडताळणी पूर्ण व अचूक करा. अर्ज करण्यासाठी शेवटच्या तारखेपूर्वी प्रक्रिया पूर्ण करा.