GST मोठा निर्णय! 12 आणि 28% रद्द, आता फक्त 5 आणि 18% GST; ‘या’ वस्तू स्वस्त होणार

महाराष्ट्र

औरंगाबाद: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी कौन्सिलच्या 56व्या बैठकीनंतर ऐतिहासिक घोषणा केली असून 22 सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार आहेत. म्हणजेच 12% आणि 28% स्लॅब संपुष्टात आले आहे.

आता जाणून घ्या कोणत्या वस्तू-सेवा स्वस्त झाल्या आहेत.

5% जीएसटीमध्ये स्वस्त झालेल्या वस्तू

हेअर ऑईल, शॅम्पू, टूथपेस्ट, टॉयलेट सोप, टूथब्रश, शेव्हिंग क्रीम

बटर, तूप, चीज, डेअरी स्प्रेड

पॅकेज्ड नमकीन, भुजिया, मिक्श्चर

भांडी

बाळांच्या दूध बाटल्या, नॅपकिन, डायपर

शिलाई मशीन व सुटे भाग

हेल्थकेअर सेक्टर

आरोग्यविमा व आयुर्विमा – जीएसटी आता शून्य

थर्मामीटर, मेडिकल ग्रेड ऑक्सिजन – 12% वरून 5%

डायग्नोस्टिक किट, रिएजन्ट – 12% वरून 5%

ग्लुकोमीटर, टेस्ट स्ट्रिप्स – 12% वरून 5%

करेक्टिव्ह स्पेक्टॅकल्स – 12% वरून 5%

शिक्षण साहित्य

मॅप, चार्ट्स, ग्लोब्स – 12% वरून शून्य

पेन्सिल, शार्पनर, क्रेयॉन्स, पेस्टल – 12% वरून शून्य

कृती पुस्तकं, नोटबुक – 12% वरून शून्य

खोडरबर – 5% वरून शून्य

कृषी क्षेत्र

ट्रॅक्टर – 12% वरून 5%

ट्रॅक्टर टायर व सुटे भाग – 18% वरून 5%

बायो-पेस्टिसाईड्स, मायक्रो न्युट्रिएन्ट्स – 12% वरून 5%

ड्रिप सिंचन, स्प्रिंकलर्स – 12% वरून 5%

नांगरणी, पेरणी, कापणी, मळणीची यंत्रं – 12% वरून 5%

ऑटोमोबाईल सेक्टर

पेट्रोल/पेट्रोल हायब्रिड/APG/CNG कार (1200cc, 4000mm आत) – 28% वरून 18%

डिझेल/डिझेल हायब्रिड कार* (1500cc, 4000mm आत) – 28% वरून 18%

तीनचाकी वाहनं – 28% वरून 18%

मोटरसायकल (350cc व त्याखालील) – 28% वरून 18%

मालवाहतूक वाहनं – 28% वरून 18%

इलेक्ट्रॉनिक्स

एअर कंडिशनर – 28% वरून 18%

टीव्ही (32 इंचाहून मोठे, LED/LCD) – 28% वरून 18%

मॉनिटर्स व प्रोजेक्टर्स – 28% वरून 18%

डिश वॉशिंग मशीन – 28% वरून 18%

थोडक्यात दैनंदिन वापराच्या वस्तू, आरोग्य सेवा, शिक्षण साहित्य, कृषी यंत्रं, गाड्या आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू आता स्वस्त होणार आहेत.