औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत मतदान प्रक्रियेत यंदा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. पहिल्यांदाच चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत निवडणूक होत असून, त्यामुळे प्रत्येक मतदाराला चार मतदान करणे बंधनकारक असणार आहे.
मतदान कधी होणार
१५ जानेवारी २०२६ रोजी
एकूण २९ प्रभाग
११५ नगरसेवकांची निवडणूक
चार सदस्यीय प्रभाग पद्धत म्हणजे काय
प्रत्येक प्रभागातून ४ नगरसेवक निवडले जाणार
त्यामुळे प्रत्येक मतदाराला ४ मतदान करणे आवश्यक
एकही मतदान सोडता येणार नाही
चार मतदान न केल्यास काय होणार
एखाद्या मतदाराने फक्त १ किंवा २ मतदान केले
उर्वरित मतदानासाठी नोटा बटन दाबणे आवश्यक.
मतदाराने नकार दिल्यास
मतदान केंद्रावरील एजंटांच्या उपस्थितीत
केंद्राध्यक्ष नोटा बटन दाबून प्रक्रिया पूर्ण करतील
ईव्हीएमवर मतदान कसे करावे
पहिल्या उमेदवाराला मतदान
त्यानंतर उर्वरित ३ मतदान करणे आवश्यक
सलग ४ वेळा बटन दाबल्याशिवाय मतदान पूर्ण होणार नाही
निवडणूक विभागाची अधिकृत माहिती
निवडणूक विभागाचे उपायुक्त यांनी स्पष्ट केले आहे की….
एक मतदान केल्यानंतर उर्वरित तीन मतदान करणे आवश्यक
मतदान नको असल्यास नोटा बटन दाबणे बंधनकारक असून केंद्राध्यक्षाला आयोगाकडून तसे अधिकार देण्यात आलेले आहे.
महत्त्वाची सूचना मतदारांसाठी
मतदान केंद्रावर जाताना चार मतदान करायचे आहेत हे लक्षात ठेवा.