पालिकेच्या गलथान कारभारा विरोधात कॉंग्रेसचा मनपा पी/ उत्तर कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा

मालाड: रस्त्यांवर पडलेले खड्डे, अशुद्ध पाणी पुरवठा, विकास कामांमधील दिरंगाई अशा विविध विषयांवरुन पालिका प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी आज कॉंग्रेस मालाड पश्चिम विधानसभा क्षेत्राच्या वतीने मनपा पी/ उत्तर विभाग कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध वक्त्यांनी आपल्या भाषणात बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराचा पाढाच वाचला. प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सदस्य हैदरअली शेख आपल्या भाषणात म्हणाले, […]

अधिक वाचा..

नाना शंकरशेट यांची १५८ वी पुण्यतिथी महानगरपालिकेत साजरी

मुंबई: नामदार जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांच्या १५८ व्या पुण्यतिथीनिमित्त महापौर दालनातील त्यांच्या प्रतिमेस उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे यांनी आज (दि. ३१) रोजी पुष्पहार अर्पण करुन महानगरपालिके तर्फे अभिवादन केले. यावेळी महानगरपालिका उपसचिव रसिका देसाई, अखिल भारतीय दैवज्ञ समाजउन्नोती परिषदेचे अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी, सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट, उपाध्यक्ष […]

अधिक वाचा..

भाजपचे माजी नगरसेवक पालिका कार्यालयात बसणार असतील तर…

मुंबई: भाजपचे माजी नगरसेवक जर पालकमंत्र्यांच्या कार्यालयात बसणार असतील तर इतर पक्षांची पक्ष कार्यालये देखील खुली करण्यात यावीत, अशी मागणी आमदार अस्लम शेख यांनी केली आहे. विधानभवन परिसरात प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना शेख यांनी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पालिकेतील कार्यालयावर आक्षेप नोंदवत पालिकेतील पालकमंत्र्यांच्या कार्यालयाबाबत कोणतीही तरतुद नसल्याचे सांगितले. शेख म्हणाले, पालकमंत्री महानगरपालिकेत जाऊन आपलं […]

अधिक वाचा..

शिरुर नगरपरिषद हद्दीत अनाधिकृत जीओचे पोल काढण्याचे तात्काळ आदेश द्यावे अन्यथा…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरात फायबर प्रा.लि, या कंपनीला पोल उभारण्याची परवानगी दिलेली आहे. परंतु सदर कंपनीने नगरपरिषदेने घालून दिलेल्या अटी व शर्थीचा भंग केला आहे. शिरूर नगरपरिषद हद्दीतील ‘शिवसेवा’ मंडळाच्या गाळ्यांसमोर सिमेंटच्या रस्त्यावरच बेकायदा पोल बसवण्यासाठी ब्रेकरच्या साहय्याने आत्ताच नव्याने करण्यात आलेला सिमेंटचा रस्ता खोदून पोल उभे केलेले आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या साईट पट्यावर […]

अधिक वाचा..

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांचे फायर ऑडिट करणार; उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई: मुंबई महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या सर्व रुग्णालयांचे लवकरच फायर ऑडिट करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले. मुंबई महानगरपालिका रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याने धोका निर्माण झाल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य सर्वश्री सुनील राऊत, अमित देशमुख, सुनील प्रभू, अमिन पटेल, आशिष शेलार, राम कदम, राजेश टोपे, अजय चौधरी, रवी राणा यांनी उपस्थित केला होता. मंत्री […]

अधिक वाचा..

मुंबईतील सर्व समुद्र किनाऱ्यावर मुलांना जाण्यास रोखण्यासाठी पालिका कर्मचारी नियुक्ती करावेत…

मुंबई: मुंबईतील जुहू कोळीवाडा येथील समुद्रात सायकांळच्या सुमारास पोहायला गेलेली 5 मुले समुद्रात आलेल्या भरतीच्या लाटेत खोल पाण्यात ओढली जावून बुडून त्यांचा मृत्यु झाला आहे. त्यादिवशी समुद्रात भरती असल्याने मुलाना खोल पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे ते समुद्रात अर्ध्या किमी आतमध्ये ओढले गेल्याने त्या चार मुलाचा दुदैवी मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका […]

अधिक वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. भालचंद्र भाटवडेकर यांची जयंती महानगरपालिकेत साजरी

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्‍या जयंतीनिमित्त महानगरपालिका सभागृहातील त्यांच्या अर्धपुतळ्यास उप आयुक्त (परिमंडळ -२) रमाकांत बिरादार यांनी आज (दिनांक १९ फेब्रुवारी, २०२३) सकाळी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच १८९८ ते १८९९ या कालावधीत तत्कालीन बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष असलेले आणि मुंबईच्या नागरी व प्रशासकीय जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे डॉ.भालचंद्र कृष्णा भाटवडेकर यांच्या […]

अधिक वाचा..

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे शिवजयंती उत्सव संपन्न

मुंबई: हिंदवी स्वराज्याची स्वबळावर निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित ‘शिवजयंती उत्सव’ छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथील छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यास महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते (दि. १९) फेब्रुवारी २०२३ पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी स्थानिक आमदार सदानंद सरवणकर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक […]

अधिक वाचा..

पालिका अधिकारी मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल

मुंबई: ठाण्याचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ठाण्याचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर हे काल सायंकाळी कामकाज […]

अधिक वाचा..

वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित स्पर्धेत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रथम

मुंबई: माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस १५ ऑक्टोबर हा “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेचे निकाल मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले. यात बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि तृतीय क्रमांक भिंवडी-निजामपूर महानगरपालिका यांना जाहीर झाला आहे. माजी […]

अधिक वाचा..