ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचे सहकुटुंब विधिवत पूजन करून देवीची प्राणप्रतिष्ठा केली.ठाणे पूर्व येथील संत तुकाराम महाराज मैदानात चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त देवीची स्थापना करण्यात आली असून पुढील नऊ दिवस येथे विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी शिंदे कुटुंबियांनी विधीप्रमाणे देवीचे पाद्यपूजन करून तिच्यावर पुष्प व कुमकुम वाहत पारंपरिक पद्धतीने पूजा व आरती केली. देवीच्या आशीर्वादाने सर्वांना सुख, शांती, भरभराट आणि आनंद लाभावा तसेच सर्वांच्या दुःखाचे निवारण व्हावे, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी खासदार Shrikant Shinde, सौ. लता शिंदे, सौ. वृषाली शिंदे, नातू रुद्रांश तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.