ठाण्यातील म्हाडाच्या घरांच्या किमतीत मोठा दिलासा; २०२०-२१ च्या रेडी रेकनर दरानुसारच किंमत

ठाणे: ठाण्यातील चितळसर-मानपाडा येथील म्हाडाच्या गृहप्रकल्पातील घरांच्या किमतीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. २०२०-२१ च्या रेडी रेकनर दरानुसारच घरांची किंमत निश्चित करण्याचे आदेश त्यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. चितळसर-मानपाडा येथील म्हाडाच्या गृहप्रकल्पात एकूण १,१७३ घरे उपलब्ध झाली आहेत. त्यापैकी ९३८ घरांची सोडत १४ जुलै २०२५ रोजी […]

अधिक वाचा..

अजित पवार गटाला ठाण्यात मोठा धक्का; युवक अध्यक्ष विरु वाघमारेंसह शेकडो कार्यकर्ते शरद पवार गटात

‘भटकलेले पक्षी पुन्हा घरट्यात परतले’; जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला ठाण्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर युवक अध्यक्ष विरु वाघमारे, सरचिटणीस हेमंत वाणी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला. डॉ. जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश […]

अधिक वाचा..

ठाणे अंतर्गत मेट्रोबाबतचे गैरसमज दूर करा; नागरिकांशी संवाद साधा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महारेलला जनजागृती, चर्चासत्रे आणि तीन आठवड्यांत पर्यायी मार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश ठाणे : ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महारेल प्राधिकरणाला दिले. प्रकल्पावरील आक्षेप समजून घेऊन ते तातडीने सोडवण्यासाठी विविध ठिकाणी चर्चासत्रे आयोजित करण्यासही त्यांनी सांगितले. १२,२०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पात २६ किलोमीटरचा […]

अधिक वाचा..

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९०० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रकल्पाचे काम ‘फास्टट्रॅक’ पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेताना त्यांनी प्रशासकीय दिरंगाई सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. […]

अधिक वाचा..

ठाणे-पालघरमध्ये विजयाचे बिनविरोध फाटक उघडले; एकनाथ शिंदे

महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाल्याने विजयाचे फाटक उघडले असून हा महायुतीच्या एकजुटीचा आणि विकासाभिमुख राजकारणाचा विजय असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री यांनी केले. ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, ठाणे-पालघरसह विविध विधानपरिषद मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना मिळालेला पाठिंबा हा राज्यातील जनतेचा […]

अधिक वाचा..

ठाण्यात अत्याधुनिक ‘लेग्रँड इन्स्टिट्यूट’चे उद्घाटन; युवकांच्या स्वप्नांना नवे पंख; एकनाथ शिंदे

मुंबई: Eknath Shinde यांनी ठाण्यातील अत्याधुनिक ‘लेग्रँड इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग अँड एज्युकेशन’ प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करताना, “हे केवळ इमारतीचे उद्घाटन नसून युवकांच्या आकांक्षा आणि स्वप्नांना नवी दिशा देणाऱ्या प्रवासाची सुरुवात आहे,” असे प्रतिपादन केले. ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात कौशल्य विकास मंत्री Mangal Prabhat Lodha, फ्रान्सच्या मुंबईतील उप-वाणिज्यदूत ॲग्नेस सिल्वा, Legrand India चे मुख्य कार्यकारी अधिकारी […]

अधिक वाचा..

ठाण्यात पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस सुरू; प्रवास होणार अधिक सुखकर

ठाणे: ठाणे महानगरातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी महापालिका भवन ते लुईसवाडी आणि पुन्हा महापालिका भवन असा प्रवास या बसमधून करत सुविधेची पाहणी केली. या प्रसंगी महापौर शर्मिला पिंपळोलकर, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपमहापौर कृष्णा पाटील आदी […]

अधिक वाचा..

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde ठाणे: “पूर्वी ‘पुणे तिथे काय उणे’ म्हटले जायचे; आता ‘ठाणे तिथे काय उणे’ असे आत्मविश्वासाने म्हणण्याची वेळ आली आहे,” असे सांगत उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी ठाण्याच्या झपाट्याने होत असलेल्या विकासाचा आढावा घेतला. क्रेडाई एमसीएचआय ठाणे युनिट आयोजित 23 व्या रियल […]

अधिक वाचा..

गुढीपाडव्याला ठाण्यात देवीची प्राणप्रतिष्ठा; उपमुख्यमंत्री शिंदे यांची सहकुटुंब पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचे सहकुटुंब विधिवत पूजन करून देवीची प्राणप्रतिष्ठा केली.ठाणे पूर्व येथील संत तुकाराम महाराज मैदानात चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त देवीची स्थापना करण्यात आली असून पुढील नऊ दिवस येथे विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले […]

अधिक वाचा..

ठाण्यात खंडणीखोर टोळीचा पर्दाफाश; दोन लाखांची मागणी करणारे दोघे अटकेत

ठाणे: ठाण्यातील प्रसिद्ध ‘गौरव स्वीट्स’ या मिठाई दुकानाबाहेरील स्टॉलवर महापालिकेमार्फत कारवाईची भीती दाखवत दोन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या सुशांत सुर्वे आणि त्याच्या सहकाऱ्याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत सुर्वे याचा यापूर्वीही लाचलुचपत प्रकरणाशी संबंध आला होता. ठाणे महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त शंकर पाटोळे यांच्याशी संबंधित लाच प्रकरणात त्याला अटक झाली होती. जामिनावर सुटल्यानंतर […]

अधिक वाचा..