तुलसी विवाहानंतर सुरू होणार लगीन सराई; जाणून घ्या मार्च 2025 पर्यंतचे विवाह मुहूर्त

महाराष्ट्र

आज 15 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह साजरा केला गेला. त्यानंतर माणसांच्या विवाह सोहळ्यांना सुरुवात होईल. तुळशी विवाहानंतर सुरू होणाऱ्या विवाह मुहूर्तांबद्दलची माहिती पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी दिली आहे.

मार्च 2025 पर्यंतचे विवाह मुहूर्त

नोव्हेंबर 2024:- 17, 22, 23, 25, 26, 27

डिसेंबर 2024:- 3, 5, 6, 7, 11, 12, 14, 15, 20, 23, 24, 26

जानेवारी 2025:-16,17,19,21,22,26

फेब्रुवारी 2025:- 3, 4, 7, 13, 16, 17, 20, 21, 22, 23, 25

मार्च 2025:- 1,2,3,6,7,12,15

विवाह मुहूर्तांचं महत्त्व

विवाह हे एक अतिशय पवित्र नातं असून, ते शुभ मुहूर्तावरच झालं पाहिजे. सर्व शुभ कार्यांसाठी शुभ मुहूर्त अन् वेळ, तारीख असते. लग्नासाठीही शुभ मुहूर्त आणि तारीख असते. त्यामुळे वैवाहिक जीवन आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी शुभ वेळ आणि तारीख निश्चित करणं महत्त्वाचं आहे.