मुंबई: गुजरातमधील पुनर्बांधणीला ७५ वर्षे पूर्ण होत असताना इतिहासाचे राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते यांनी भाजप आणि पंतप्रधान यांच्यावर उपरोधिक टीका करत, “सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीशी मोदीजींचा संबंध तरी काय?” असा सवाल उपस्थित केला आहे.
गाडगीळ यांनी सांगितले की, ७५ वर्षांपूर्वी गुजरातमधील काँग्रेस अधिवेशनादरम्यान यांनी सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीची कल्पना मांडली होती. त्यानंतर ही जबाबदारी तत्कालीन नेते आणि केंद्रीय मंत्री यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मंदिराच्या उद्घाटनासाठी तत्कालीन राष्ट्रपती उपस्थित होते.“हा इतिहास विसरून काही जण आपणच मंदिराचे निर्माते असल्याचा आव आणत आहेत. काँग्रेसवर हिंदूविरोधी असल्याचा आरोप करणाऱ्यांनीच काँग्रेसच्या योगदानाचा विसर पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे,” असा आरोप गाडगीळ यांनी केला.
गाडगीळ यांनी आणखी दावा केला की, मंदिर व्यवस्थापनाने पुनर्बांधणीशी संबंधित कुटुंबियांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्याचे सांगितले होते. त्यासाठी त्यांच्याकडून संपर्क तपशीलही मागवण्यात आले. मात्र प्रत्यक्ष कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.“ज्यांचा मंदिर पुनर्बांधणीशी काडीमात्र संबंध नाही, त्यांच्याकडून आजचा कार्यक्रम उरकला जात आहे,” अशी खोचक टीकाही त्यांनी केली.