अजितदादांच्या कार्याला सलाम! आर्यनसिंह दडियालाचा २१० किमी पोहण्याचा ऐतिहासिक विक्रम

महाराष्ट्र

मुंबई: ‘कामाचा माणूस’ म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या कार्याला मानवंदना म्हणून युवक आर्यनसिंह दडियाला याने २१० किलोमीटरचे खुल्या समुद्रातील दोन-मार्गी (टू-वे) एकल (सोलो) मॅरेथॉन पोहण्याचे अभूतपूर्व यश संपादन केले आहे. महाराष्ट्र सीमेजवळील क्वेरीम बीच ते कर्नाटक सीमेजवळील पोलेम बीच या दरम्यान हा पराक्रम पार पडला.२८ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत तब्बल ४९ तास ४१ मिनिटे ०४ सेकंद अखंड पोहत आर्यनने हा विक्रम नोंदवला. कठीण समुद्री परिस्थितीतही त्याने जिद्द आणि चिकाटीचा परिचय दिला.

दरम्यान, या कामगिरीची माहिती देण्यासाठी आर्यनने राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांची देवगिरी येथे भेट घेतली.आर्यनसिंह दडियाला म्हणाला की, “अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी आयुष्यभर अथक परिश्रम घेतले. त्यांच्या कार्याला सलाम म्हणून मी हा विक्रम देशाला समर्पित केला.”

या विक्रमासाठी गोवा स्विमिंग असोसिएशनचे अध्यक्ष योगिराज कामत, SFI चे खजिनदार सुधेश, NIWS चे डॉ. पवन गुप्ता, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडामंत्री रमेश तवडकर, प्रशिक्षक डॉ. मोहन रेड्डी तसेच पायलट सुबोध सुळे, सचिन आणि दीपक यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.काळोख्या रात्री, प्रचंड वारे, पाण्याखालील वेगवान प्रवाह, दर ६ तासांनी बदलणारी भरती-ओहोटी आणि जेलीफिशच्या दंशांसारख्या आव्हानांवर मात करत आर्यनने अखंड पोहण्याचा निर्धार पूर्ण केला.आर्यनचा हा पराक्रम युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, जिद्द आणि समर्पणाची जिवंत उदाहरण म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत