डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा पहिला धक्का; अनेक बड्या कंपन्यांनी उत्पादन थांबवल…

महाराष्ट्र

मुंबई: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफचा परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. तामिळनाडूच्या तिरुप्पूरमधील अमेरिकेत निर्यात करणाऱ्या कापड कंपन्यांनी उत्पादन थांबवलं आहे.

कापड कंपन्यांनी आता पर्यायी विचार करण्यास सुरुवात झाली आहे. कापड कंपन्यांनी उत्पादन थांबवल्याने कामगारांची बेरोजगारीची चिंता वाढली आहे.

अमेरिकेने काही दिवसांपूर्वी भारतावर ५० टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली. त्यानंतर कंपन्या अमेरिकेला कापड निर्यात करण्यावरून फेरविचार करु लागली आहे. काही कंपन्या त्वरित मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत नाही. त्यामुळे काही कंपन्या परिस्थिती पाहून निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

भारत आणि ब्रिटेनमध्ये मुक्त व्यापाराची करार झाल्यानंतर तिरुप्परमधील कंपन्यांचं लक्ष ब्रिटेनमधील बाजाराकडे लागलं आहे. तिरुप्पूरला ‘निटवेयर हब’ बोललं जातं. अमेरिकेतील बाजारात वर्षाला जवळपास १२००० कोटी रुपयांच्या कापडाची निर्यात होते. जगभरात तिरुप्पूर आणि आजूबाजूच्या क्षेत्रातून एकूण ४५००० कोटी रुपयांच्या कापडाची निर्यात केली जाते.

तिरुप्पर निर्यातक संघाचे अध्यक्ष के. एम. सुब्रमण्यन यांनी म्हटलं की, ‘जगभरात तिरुप्पूर या भागातून एकूण ४५००० कोटी रुपयांच्या कापडाची निर्यात केली जाते. यातील १२००० कोटी रुपयांच्या कापडाची निर्यात अमेरिकीतील बाजारात केली जाते. टॅरिफमुळे साधारण ६००० कोटी रुपयांच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे’. टीईएच्या सदस्यांनी सांगितलं की, ‘ट्रम्प यांच्या निर्णयानंतर तात्काळ काही कारखान्यांनी उत्पादन थांबवलं आहे. कंपनी आता इतर पर्यायाचा विचार करु लागली आहे.

टीईएचे सुब्रमण्यन यांनी म्हटलं की, ‘अमेरिकेला निर्यात होणाऱ्या कापडाचं उत्पादन थांबवण्यात आलं आहे. याचा व्यापारावर गंभीर परिणाम होणार आहे. आम्ही दोन आठवडे वाट पाहू. त्यानंतर पुढील रणनीती ठरवू’.