1 एप्रिलपासून बदलणार ‘हे’ नियम, जाणून घ्या…

महाराष्ट्र

औरंगाबाद: एप्रिल महिना अनेक नवीन बदलांसह दार ठोठावणार आहे. शेअर बाजार, गुंतवणूक, आयकर यासह तुमच्या इतर खर्चाशी संबंधित अनेक नियम बदलत आहेत. जाणून घ्या एप्रिलपासून काय बदल होणार आहे ते…

1 एप्रिलपासून होंडा, टाटा, मारुतीसह अनेक कंपन्यांची वाहने महागणार

तुम्ही 1 एप्रिलनंतर वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशावर आणखी बोजा पडेल. Honda, Maruti Suzuki, Tata Motors, Hero Motocorp सारख्या कंपन्यांनी 1 एप्रिलपासून त्यांच्या वाहनांच्या विविध प्रकारांच्या किंमती वाढवणार असल्याची घोषणा केली आहे.

एप्रिल 2023 मध्ये बँक सुट्ट्या

एप्रिलमध्ये बँकांना एकूण 15 दिवस सुट्या असतील. यात सण, वर्धापनदिन आणि शनिवार व रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. महिन्याची सुरुवात सुट्टीने होत आहे. या वेळी एप्रिलमध्ये आंबेडकर जयंती, महावीर जयंती, ईदसह इतर दिवशी बँका बंद राहतील. याशिवाय एकूण सात दिवस वीकेंडच्या सुट्ट्या आहेत.

दिव्यांगजनांसाठी UDID अनिवार्य असेल 

17 सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांना 1 एप्रिलपासून केंद्राकडून जारी केलेले युनिक आयडेंटिफिकेशन कार्ड (UDID) क्रमांक अनिवार्यपणे द्यावा लागेल. सरकारने म्हटले आहे की ज्यांच्याकडे यूडीआयडी कार्ड नाही त्यांना अपंगत्व प्रमाणपत्रासह यूडीआयडी नोंदणी क्रमांक (केवळ यूडीआयडी पोर्टलवरून तयार केलेला) द्यावा लागेल.

फक्त 6 अंकी HUID हॉलमार्क दागिने विकले जातीत

1 एप्रिलपासून देशात फक्त तेच सोन्याचे दागिने विकेल जातील ज्यावर सहा अंकी ‘हॉलमार्क अल्फान्यूमेरिक युनिक आयडेंटिफिकेशन’ (HUID) क्रमांक असेल. याचा अर्थ 31 मार्चनंतर दुकानदारांना HUID शिवाय जुने हॉलमार्क असलेले दागिने विकण्याची परवानगी मिळणार नाही.

उच्च प्रीमियम असलेल्या विमा पॉलिसीवर कर आकारला जाईल

2023 च्या अर्थसंकल्पात असे घोषणा करण्यात आली होती की जर तुमच्या विम्याचा वार्षिक प्रीमियम 5 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर आकारला जाईल. आतापर्यंत विम्याचे नियमित उत्पन्न पूर्णपणे करमुक्त होते. हा नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे.

सोन्याच्या रूपांतरणावर भांडवली लाभ कर लागू होणार नाही

यंदाच्या अर्थसंकल्पात असे जाहीर करण्यात आले आहे की, 1 एप्रिलपासून तुम्ही भौतिक सोन्याचे ई-गोल्डमध्ये किंवा ई-गोल्डचे भौतिक सोन्यात रूपांतर केल्यास त्यावर कोणताही भांडवली नफा कर भरावा लागणार नाही. सोन्यावर दीर्घकालीन भांडवली नफा कर लागू आहे.

एलपीजी, सीएनजी, पीएनजीच्या किमतींमध्ये सुधारणा

देशातील पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेलाच्या किंमतीत सुधारणा करतात. यावेळीही तेलाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतींवर लक्ष ठेवले जाईल.