दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणीसाठी विजय वडेट्टीवार दोन दिवसांच्या दौऱ्यावर

महाराष्ट्र

नागपूर, वर्धा, हिंगोली आणि जालना जिल्ह्यांतील शेतकऱ्यांशी साधणार संवाद

मुंबई: महाराष्ट्र लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार हे ७ आणि ८ ऑक्टोबर रोजी राज्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दोन दिवसांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते नागपूर, वर्धा, हिंगोली आणि जालना जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

विजय वडेट्टीवार यांच्या दौऱ्याची सुरुवात ७ ऑक्टोबर रोजी सकाळी नागपूर येथून होणार आहे. त्यानंतर ते वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतीची पाहणी करतील. त्यानंतर आष्टी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील पानकन्हेर गावाला भेट देणार आहेत. तेथे दुष्काळग्रस्त शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधतील.८ ऑक्टोबर रोजी वडेट्टीवार हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि सेनगाव तालुक्यांतील दुष्काळग्रस्त गावांना भेटी देणार आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेणार असून दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.

यानंतर दुपारी ते जालना जिल्ह्यातील मंठा आणि परतूर तालुक्यांचा दौरा करून दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करतील. या ठिकाणीही शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेणार आहेत.या दोन दिवसांच्या दौऱ्यात प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधून दुष्काळाची सद्यस्थिती, शेतीचे नुकसान आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणींची माहिती घेतली जाणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत