ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांनी रस्त्यावर उतरावे; अन्यथा पापाचे वाटेकरी ठराल : विजय वडेट्टीवार

नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक नुकसान होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणावर संकट निर्माण झाले असताना मंत्रिमंडळात असलेले छगन भुजबळ यांनी केवळ भूमिका मांडण्याऐवजी रस्त्यावर उतरून ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढले पाहिजे, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ओबीसी समाजाचे अक्षरशः वाटोळे […]

अधिक वाचा..

गडचिरोलीच्या विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संपत्ती लुटण्याचा डाव; वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

गडचिरोली: उद्योगांच्या माध्यमातून गडचिरोलीचा कायापालट करण्याच्या घोषणा सत्ताधाऱ्यांकडून केल्या जात असल्या, तरी जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, रस्ते, सिंचन आणि रोजगाराच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. उद्योगांचे गाजर दाखवून नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असलेल्या गडचिरोलीची लूट करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा गंभीर आरोप विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केला. गडचिरोलीच्या दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणा अपुरी असून डॉक्टर, परिचारिका आणि […]

अधिक वाचा..

अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूवर वडेट्टीवार आक्रमक; आठ दिवसांत चौकशी अहवाल जाहीर करण्याची मागणी

अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागाला लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी रुग्णालयाची पाहणी करून घटनेची माहिती घेतली. रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी आणि कालबाह्य फायर सेफ्टी ऑडिटवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. या दुर्घटनेपूर्वीच अग्निशमन विभागाने फायर सेफ्टी […]

अधिक वाचा..

अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या ताटात निकृष्ट आहार? प्रयोगशाळा अहवालाने खळबळ; विजय वडेट्टीवार आक्रमक

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांना पुरविण्यात येणाऱ्या गरम व ताज्या आहाराच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गोंडपिंपरी आणि पोंभुर्णा तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांना पुरविण्यात येणाऱ्या काही खाद्यपदार्थांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली असता, काही पदार्थ निर्धारित मापदंडांनुसार नसल्याचे, तर काही पदार्थ सेवनासाठी असुरक्षित असल्याचे अहवालातून समोर आले आहे. या प्रकरणावर विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी […]

अधिक वाचा..

धर्माच्या राजकारणात ओबीसींना अडकवून हक्कांचे प्रश्न दडपण्याचा डाव; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

चंद्रपूर: धर्म आणि भावनेच्या राजकारणात बहुजन-ओबीसी समाजाला अडकवून त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. तरुणांच्या हाताला रोजगार नाही, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या पुरेशा संधी नाहीत, शेतकरी आर्थिक संकटात आहे आणि ओबीसींच्या आरक्षणासह संविधानिक हक्कांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. त्यामुळे भावनिक राजकारणाला बळी न पडता बहुजन-ओबीसी […]

अधिक वाचा..

ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विराट जनआक्रोश मोर्चा; भाजप सरकारवर घणाघाती हल्लाबोल

महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि स्मार्ट मीटरवरून सरकारवर टीका; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन ब्रह्मपुरी: केंद्र आणि राज्य सरकारच्या कथित जनविरोधी धोरणांविरोधात काँग्रेसतर्फे ब्रह्मपुरी येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली विराट जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडांगण येथून निघालेल्या या मोर्चात हजारो नागरिक, महिला, युवक, शेतकरी, कामगार तसेच काँग्रेसचे पदाधिकारी […]

अधिक वाचा..

कुणबी प्रमाणपत्र वाटपामागे कोणाचा दबाव? विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल

ओबीसी आरक्षण, मोहन भागवतांचा युवक संवाद आणि आदिवासी विभागाच्या ६०० कोटींच्या थकीत देण्यांवरही सरकारवर हल्लाबोल नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार टीका केली. मराठवाड्यातील तीन जिल्हा परिषद सदस्य आणि एका नगरसेवकाचे कुणबी जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने सदस्यत्व रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारच्या प्रमाणपत्र वाटप प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जर ही […]

अधिक वाचा..

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका नागपूर: पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून, विद्यमान कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यानेच ही परिस्थिती […]

अधिक वाचा..

निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकरी संकटात; मोशी दुर्घटनेतील जबाबदारांवर कारवाईची वडेट्टीवारांची मागणी

मुंबई: विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दोन महत्त्वाच्या जनहिताच्या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरले. विदर्भातील निकृष्ट व बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचा मुद्दा उपस्थित करत दोषी कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर व संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे […]

अधिक वाचा..

नाशिक रिंगरोड भूसंपादन प्रकरणाची १५ दिवसांत चौकशी; शेतकऱ्यांवर जबरदस्ती नको; विजय वडेट्टीवार

मुंबई: नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित रिंगरोड प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. या प्रकरणात अलायन्मेंट बदल, शेतकऱ्यांवर दबाव, तसेच अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी विधानसभेत केली. प्रश्नोत्तराच्या तासात वडेट्टीवार यांनी सांगितले की, रिंगरोडसाठी करण्यात आलेल्या भूसंपादनात गंभीर अनियमितता झाल्याच्या तक्रारी […]

अधिक वाचा..