‘ओ रोमियो’ची OTT रिलीज कधी? शाहिद कपूर-तृप्ती डिमरीचा बहुचर्चित क्राइम-थ्रिलर कुठे पाहता येणार?

महाराष्ट्र

मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘ओ रोमियो’ या बहुप्रतीक्षित क्राइम-थ्रिलर चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. दिग्दर्शक विशाल भारद्वाज आणि शाहिद कपूर यांची ही चौथी एकत्रित फिल्म असल्याने चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता आहे. यापूर्वी या जोडीने ‘कमीने’, ‘हैदर’ आणि ‘रंगून’ सारखे गाजलेले चित्रपट दिले आहेत.

हा चित्रपट १३ फेब्रुवारी २०२६ रोजी व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. रोमॅन्स, ॲक्शन आणि सस्पेन्सचा मिलाफ असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खास ठरणार असल्याचे मानले जात आहे.

OTT रिलीजबाबत काय अपडेट?

थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर ‘ओ रोमियो’ अमेझॉन प्राइम व्हिडिओवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे.साधारणपणे हिंदी चित्रपट ४५ ते ६० दिवसांच्या थिएटर रननंतर OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होतात. त्यानुसार, ‘ओ रोमियो’ हा चित्रपट मार्च अखेर किंवा एप्रिल २०२६ च्या पहिल्या आठवड्यात प्राइम व्हिडिओवर पाहता येण्याची शक्यता आहे.हा चित्रपट २७ मार्च २०२६ रोजी OTT वर येऊ शकतो. मात्र, निर्मात्यांकडून याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दमदार स्टारकास्ट

या चित्रपटात शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्यासोबतच अनेक नामवंत कलाकारांची फौज आहे

अविनाश तिवारी

विक्रांत मेस्सी

तमन्ना भाटिया

नाना पाटेकर

दिशा पटानी

फरीदा जलाल

टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे. शाहिदचा तीव्र आणि रहस्यमय लूक, तसेच तृप्ती डिमरीची प्रभावी भूमिका यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे.

रिलीजपूर्वीच कोट्यवधींची कमाई

चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सॅकनिल्कच्या अहवालानुसार

देशभरात विकली गेलेली तिकिटे: १६,२०३

एकूण बुक झालेले शो: ३,४४४

ॲडव्हान्स बुकिंग कमाई: ₹३६.६५ लाख

ब्लॉक सीट्ससह एकूण कमाई: ₹१.४२ कोटी

रिलीजपूर्वीच मिळालेल्या या प्रतिसादामुळे निर्माते आणि कलाकारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने चित्रपट प्रदर्शित होत असल्याने पहिल्या विकेंडला मोठी ओपनिंग मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय आहे अपेक्षा?

‘ओ रोमियो’मध्ये क्राइम, प्रेमकथा आणि ॲक्शनचा तगडा संगम पाहायला मिळणार आहे. विशाल भारद्वाज यांची खास शैली, दमदार पार्श्वसंगीत आणि गुंतागुंतीची कथा यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल, अशी चर्चा आहे.आता प्रेक्षकांची नजर १३ फेब्रुवारीच्या रिलीजकडे लागली असून, त्यानंतर OTT वर हा चित्रपट कधी येणार याची उत्सुकता अधिक वाढली आहे.थिएटरनंतर घरबसल्या ‘ओ रोमियो’ पाहण्यासाठी प्रेक्षकांना काही आठवडे प्रतीक्षा करावी लागणार आहे.