मुंबई: विधानसभा निवडणुकीपूर्वी Matrize चा सर्व्हे समोर आला आहे. ज्यामद्ये महाराष्ट्रातील सत्ता आणि महायुती-महाविकास आघाडीचं भवितव्य काय असणार याचा अंदाज समोर आलं आहे. सर्वेक्षणात प्रदेशनिहाय किती जागा कोणाला मिळणार? याचा सुद्धा अंदाज समोर आला आहे.
विभागनिहाय किती जागा कोणाला मिळणार?
पश्चिम महाराष्ट्र
महायुती: 70 जागांपैकी महायुतीला 31-38 जागा आणि 48 टक्के मते मिळू शकतील.
महाविकास आघाडी: MVA ला 70 जागांपैकी 29-32 जागा आणि पश्चिम महाराष्ट्रात 40 टक्के मते मिळतील असा अंदाज
विदर्भ
महायुती:- महायुतीला विदर्भात 62 जागांपैकी 32-37 जागा आणि 48 टक्के मते मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.
महाविकास आघाडी:- विदर्भात 62 जागांपैकी 21-26 जागा आणि 39 टक्के मतं ही महाविकास आघाडीला मिळू शकतात.
मराठवाडा
महायुती:- 46 जागांपैकी 18-24 जागा. मराठवाड्यात 47 टक्के मते महायुतीला मिळतील असा अंदाज
महाविकास आघाडी:- मराठवाड्यातील 46 जागांपैकी 20-24 जागा आणि 44 टक्के मते मिळतील असा सर्व्हेमध्ये अंदाज
ठाणे-कोकण
महायुती:- ठाणे-कोकण विभागातील 39 जागांपैकी 23-25 आणि 52 टक्केवारी मते महायुतीला मिळू शकतात.
महाविकास आघाडी:- ठाणे-कोकण विभागातील 39 पैकी 10-11 जागा आणि 32 टक्के मते महाविकास आघाडीला मिळू शकतात.
मुंबई
महायुती:- मुंबईला 36 जागांपैकी 21-26 जागा मिळतील आणि 47 टक्के मते मिळतील, असं सर्व्हेमध्ये म्हटलंय.
महाविकास आघाडी:- 36 जागांपैकी 10-13 जागा आणि मुंबईत 41 टक्के मते मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.
उत्तर महाराष्ट्र
महायुती:- उत्तर महाराष्ट्रातील 35 जागांपैकी 14-16 जागा महायुतीला मिळतील असं अंदाज वर्तविण्यात आला आहे.
महाविकास आघाडी:- उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 35 जागांपैकी 16-19 जागा आणि 47 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.