जेव्हा सगळे शेपूट घालुन बसले होते. तेव्हा हा पठ्या भांडलाय तुमच्यासाठी; डॉ कोल्हे यांचा अजित पवारांना टोला

मुख्य बातम्या राजकीय

शिरुर (तेजस फडके) ज्या भारतीय जनता पक्षाची तळी घेऊन आता तुम्ही एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला शिरुर लोकसभा मतदार संघात येताय. याचं भारतीय जनता पक्षानी जेव्हा तुम्ही विधानसभेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना ‘स्वराज्यरक्षक’ म्हणाला होतात. त्यावेळी जोडे मारा आंदोलन केलं होत. महाराष्ट्रभर हाच भारतीय जनता पक्ष तुमच्या प्रतिमेला जोडे मारत होता.

 

आत्ता जे तुमच्या खांद्याला खांदा लाऊन पळतायेत हे सगळे शेपूट घालुन बसलेले असताना हा पठ्या भांडलाय तुमच्यावतीन या पठ्यान व्हिडिओ करुन सांगितलयं की ‘स्वराज्यरक्षकच’ आणि आजही मी त्याच भूमिकेवर ठाम आहे. दादा भुमिका बदललीत तर खाजगीतल्या अशा अनेक गोष्टी बाहेर निघतील असं म्हणतं डॉ अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना टोला लगावला.

 

शिरुर येथील प्रचारसभेत बुधवार (दि 8) रोजी बोलताना डॉ कोल्हे पुढे म्हणाले, दादा हा व्हिडिओ करण्यासाठी मला कोणी फोन केला होता हे पण एकदा जाहीरपणे सांगावं. माझ्या 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्या प्रतिमेला कोणी जोडे मारले नाहीत हि व्यथा कोणी बोलुन दाखवली होती हे सुद्धा खाजगीतलं सांगाव. आपण कोणत्या उमेदवाराचा प्रचार करत आहात हे सुद्धा एकदा मनाला विचाराव असंही डॉ कोल्हे म्हणाले.

 

तसेच आपण 91 साली या भागाचे लोकप्रतिनिधी होतात. आपण 13 वर्षे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होतात. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी वढु आणि तुळापुरला 334 वर्षे आहे. आहे. मग तुम्ही 13 वर्षे पुण्याचे पालकमंत्री असताना का तुम्हाला कधीच त्या समाधी स्थळाचा विकास करावासा वाटला नाही. अशोक पवारांनी आणि मी पाठपुरावा केला. त्यानंतर तुम्ही संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला विकासनिधी दिला हे ही जाहीरपणे सांगावं असाही टोला डॉ कोल्हे यांनी अजित पवारांना लगावला.

अरे पठ्या तु आमदारचं कसा होतो ते बघतो; अजित पवारांचं अशोक पवारांना खुलं आव्हान

मला दम देण्यापेक्षा दादांनी कांद्याला आणि दुधाला चांगला बाजारभाव द्यावा; अशोक पवारांचं प्रत्युत्तर

शिपायाच्या नावावर ९५ लाखाचं कर्ज, मॅनेजरच्या नावावरही कोटींचं कर्ज भैरवनाथ पतसंस्थेत नेमकं चाललंय काय…?