रामलिंग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या “शिक्षणतज्ञ” पदी राणी कर्डीले

शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) रामलिंग (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतीच शालेय व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डिले यांची “शिक्षणतज्ञ” म्हणुन निवड करण्यात आली. राणी कर्डीले या उच्चशिक्षित असुन त्यांचे शिक्षण BA Ded, BPED, MSW पर्यंत झालेले आहे. तसेच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे काम उल्लेखनीय आहे. त्या रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था तसेच रामलिंग महीला पतसंस्थेच्या त्या अध्यक्षा आहेत.

राणी कर्डीले यांना शिक्षणाविषयी आवड असुन रामलिंग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्या नेहमी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद तसेच माजी आदर्श सरपंच नामदेव जाधव, माजी उपसरपंच यशवंत कर्डिले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माऊली रेपाळे, सदस्य प्रल्हाद पवार, रमेश कर्डिले, निलेश लोंढे, राधा रेपाळे, ललिता सोबले, स्वाती दगडे व इतर महिला आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्वांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.