विवेकानंदांचे तत्त्वज्ञान आम्हाला समजले नाही हे आमचे दुर्दैव…

शिरूर तालुका

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांत संघटक रमेश टाकळकर यांचे मत

शिक्रापूर (शेरखान शेख): ज्यांच्या श्रमावर देश उभा आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष नको, अठरापगड जातीची जनता त्यांच्याशी प्रकरणा नको असे तत्त्वज्ञान सांगणारे विवेकानंद आम्हाला समजले नाहीत हे आमचे विचार दारिद्र्यच असल्याचे मत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांत सहसंघटक रमेश टाकळकर यांनी व्यक्त केले.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्र कार्यालयात विवेकानंद जयंती प्रसंगी मार्गदर्शन करताना रमेश टाकळकर बोलत होते. याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे शिरुर तालुकाध्यक्ष देवेंद्र जगताप, महिला प्रतिनिधी रोहिणी दरेकर, जिल्हा सचिव संतोष शिर्के, पंडित मासळकर, दत्तात्रय ननवरे, दत्ता कवाद यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना स्वामी विवेकानंद यांनी देशातील श्री शक्ती उपेक्षित असून स्त्रियांबरोबरच बहुजन समाजाच्या शिक्षणात देशाचे कल्याण आहे.

आपल्या आत्मतत्त्वाचे विकसन म्हणजे शिक्षण अशी स्वामी विवेकानंद यांची शिक्षणाबद्दलची व्याख्या होती. आपले संकुचित विचार थांबून बदलत्या जगाचा विचार करायला हवा. मातृभूमीचे विचारधन पाश्चिमात्यां समोर मांडून तेथील प्रगतीची विचारधारा आम्हाला दारिद्र्य निर्मूलनासाठी वापरता येईल तसेच अनेक धर्मातील लोक त्यांच्यातील बुद्धिवंताला नतमस्तक होत.

स्वामीजी मधील तत्त्वेता आम्हाला रुचला नाही हे आमचे विचार दारिद्र्य म्हणावे लागेल, असे देखील अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांत सहसंघटक रमेश टाकळकर यांनी सांगितले. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे शिरुर तालुकाध्यक्ष देवेंद्र जगताप यांनी सर्वांचे आभार मानले.