वंचित बहुजन आघाडीच्या शिरूर तालुका उपाध्यक्षपदी शरद उघडे यांची निवड

शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुका वंचित बहुजन आघाडीची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या कार्यकारणी मध्ये शिरुर तालुका बहुजन आघाडीच्या उपाध्यक्षपदी कवठे येमाई येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे शरद लक्ष्मण उघडे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच अमर सुरेश उघडे यांची शिरुर तालुका संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना या निवडीचे नियुक्तीपत्र महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकुर यांच्याकडून देण्यात आले.

वंचित बहुजन आघाडी सध्या महाराष्ट्रातील आपले स्थान बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम करत आहेत. यासाठी प्रत्येक गावात महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या वंचित बहुजन आघाडी कडून देण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडी कडुन आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तयारी करण्यात येत आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती गटांसाठी उमेदवार देण्यासंदर्भात इच्छुकांची चाचपणी करण्यात येत आहे. पक्ष पुर्ण ताकदीने हि निवडणुकीत उतरणार आहे. मा.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष आपले स्थान मजबूत करताना दिसत आहे. शरद उघडे व अमर उघडे यांच्या निवडीबद्दल तालुक्यातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही निवड महत्वाची मानली जात आहे.

शरद उघडे यांनी या भागातील तरुणांचे चांगले संघटन करुन आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवला आहे. पक्षाने आगामी कवठे टाकळी जिल्हा परिषद गटात आपणास तयारी करण्याचे आदेश दिले असल्याचे वंचित बहुजन तालुका उपाध्यक्ष शरद उघडे यांनी सांगितले आहे. या जिल्हा परिषद गटात पक्षाचे स्थान मजबुत करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.