भविष्यात अध्यात्म काळाची गरज; मृणालीताई पडवळ

शिरूर तालुका

निमगाव म्हाळुंगीतील मंदिरांत त्रिपुरारी पोर्णिमेचा दिपोत्सव

शिक्रापूर (शेरखान शेख): महिला व युवती या दुर्गा मातेचे रुप असून प्रत्येकामध्ये चांगल्या प्रकारचे संस्कार रुजवून सुसंस्कृत परिवार घडवण्याचे कार्य एक स्त्री करु शकते, मात्र त्यासाठी अध्यात्म हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेच्या मातृशक्ती अभियान च्या पश्चिम महाराष्ट्र प्रमुख ॲड. मृणालीताई पडवळ यांनी केले आहे.

निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे शिवराज्य प्रतिष्ठानच्या वतीने त्रिपुरारीपौर्णिमा निमित्ताने श्री म्हसोबा मंदिर, मारुती मंदिर व महादेव मंदिर या ठिकाणी दिपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या मातृशक्ती अभियान च्या पश्चिम महाराष्ट्र प्रमुख ॲड. मृणालीताई पडवळ व सरपंच सविताताई करपे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन दिपोत्सवाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी उपसरपंच कविता रणसिंग, पोलीस पाटील किरण काळे, संतोष खामकर, अजिंक्य तारू, शिवराज्य प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब काळे, मार्गदर्शक गणपतराव काळकुटे, प्रदीप पवार, डॉ. सचिन चव्हाण, एकनाथ लांडगे, राहुल रणसिंग, म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार काळुराम चव्हाण, सोसायटीचे माजी चेअरमन दादाभाऊ काळे, उदयोगपती विजय करपे, अश्विनीताई तागड, युवा व्याख्याते विशाल मराठे व कामिनीताई नागवडे, महेश गोसावी, किरण थोरात, वामन गव्हाणे, दशरथ नागवडे, शिवाजी चौधरी, विजय तागड, चेतन जायकर, संपत चव्हाण यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी गणपतराव काळकुटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या इतिहासाला उजाळा दिला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा व्याख्याते विशाल मराठे व कामिनीताई नागवडे यांनी केले तर प्रास्ताविक अश्विनीताई तागड यांनी केले आणि शिवराज्य प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बापूसाहेब काळे यांनी आभार मानले.