नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राजुरी संस्थेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राजुरी (ता.जुन्नर) या संस्थेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार (दि. २४) रोजी संस्थेचे अध्यक्ष एम. डी. घंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली राजुरी (ता. जुन्नर) येथील श्रीराम मंगल कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. संस्थेच्या सर्व सभासदांना २०२४-२५ या आर्थिक वर्षात १० टक्के प्रमाणे लाभांश व दिवाळी भेट देऊन सभासदांची दिवाळी गोड करणार असल्याचे अध्यक्ष एम. डी. घंगाळे यांनी सांगितले. प्रसंगी सभेपुढे आलेल्या सभासद, खातेदारांच्या प्रश्नांना संचालक मंडळाने समर्पक माहिती देत उपस्थितांचे समाधान केले.

महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्रासह १२ शाखांत विस्तार असून शरदचंद्र पतसंस्थेचा सुमारे ४४२ कोटींहून अधिकचा एकत्रित व्यवसाय आहे. मार्च २०२५ अखेर सुमारे १६५७७ ग्राहकांनी या पतसंस्थेचे सभासदत्व स्वीकारले असून २४५ कोटी २२ लाखांहून अधिकच्या ठेवी व १९७ कोटी ६२ लाखांहून अधिकचे कर्जवाटप संस्थेने केलेले आहे. सभासद , खातेदारांच्या विश्वासावर पतसंस्थेला नेहमीच ऑडीट वर्ग “अ” प्राप्त झालेल्या असून या आधीच्या काळात संस्थेने पारदर्शक कारभाराच्या माध्यमातून विविध स्तरावरील अनेक पुरस्कारही प्राप्त केलेले आहेत. शरदचंद्र गौरव पुरस्काराच्या माध्यमातून पतसंस्था सामाजिक , कृषी, अध्यात्मिक , शैक्षणिक ,राजकीय क्षेत्रात नामांकन प्राप्त असलेल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरव करत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करत आहे असून या पारदर्शक कारभाराबद्दल उपस्थितांनी संचालक मंडळाचे कौतुक केले.

आजच्या डिजिटल युगाचा विचार करता शरदचंद्र पतसंस्थेकडून ग्राहकांना बँकिंग सुविधा, मनी ट्रान्स्फर , एसएमएस प्रणाली, वीजबिल स्वीकृती , सेफ लॉकर ,NEFT/RTGS या सुविधांसह सभासदांना सुमारे ३ लाखांचे अपघाती विमा संरक्षण देण्यात येत आहे.

संस्थेचे अध्यक्ष म्हणून एम.डी.घंगाळे, उपाध्यक्ष राजेंद्र औटी , सेक्रेटरी दत्तात्रय गंधट, खजिनदार भिमाजी मालुसकर, तर जी.के.औटी सर , अनंतराव गटकळ , नरेंद्र गटकळ , तुळशीराम हाडवळे, प्रमोद पाटील औटी , संजय पिंगळे , अशोक औटी, विवेक शेळके ,संदिप औटी , संतोष चव्हाण , शालिनी हाडवळे, वैशाली औटी, शांता गवळी, अशोक कणसे , रज्जाक सय्यद यांचे मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शाम आर्विकर तर वसुली अधिकारी म्हणून महावीर व्हनुरे हे कार्यरत आहेत. संस्थेचा राजुरी, आळेफाटा, नारायणगाव, आणे, पारगाव तर्फे मढ , नारायणगाव, निळवंडे, जांबूत , सावरगाव , भोसरी,घाटकोपर , वाशी तुर्भे ,ओतूर आदी शाखांत विस्तार झालेला आहे.

प्रसंगी या सर्वसाधारण सभेसाठी जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती दिपक आवटे, ग्राहक पंचायतचे प्रांत संघटनमंत्री बाळासाहेब औटी, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक भास्कर बांगर,समर्थ पॉलिटेक्निकचे विश्वस्त वल्लभ शेळके, खरेदी विक्री संघांचे संचालक लक्ष्मण घंगाळे, तुळशिराम भोईर, एकनाथ शिंदे, राजुरीच्या सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच ज्ञानेश्वर शेळके , माजी उपसरपंच संजय गवळी, नंदकुमार हाडवळे, भरत घंगाळे, गणेश दूध संस्थेचे चेअरमन सुभाष औटी, डी. बी गटकळ, गोविंद औटी, यांचेसह विविध शाखांचे सल्लागार, खातेदार व सभासद, सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेचे प्रस्ताविक संस्थेचे संचालक जी. के. औटी सर यांनी केले. सभावृत्तांत वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी शाम अर्विकर यांनी तर तुळशीराम हाडवळे यांनी सूत्रसंचालन केले , अनंतराव गटकळ यांनी आभार मानले.