१,२३१ अनुदानित महाविद्यालयांचे कामकाज आता डिजिटल; ‘ई-ऑफिस प्रणाली’चे लोकार्पण

मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कागदरहित करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘ई-ऑफिस प्रणाली’चे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रणालीमुळे राज्यातील १,२३१ अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज डिजिटल पद्धतीने होणार आहे. महाविद्यालये, विभागीय सहसंचालक कार्यालये, उच्च शिक्षण संचालनालय आणि मंत्रालयातील उच्च व […]

अधिक वाचा..

दापचरीत 1,395 एकरांवर उभारणार आंतरराष्ट्रीय कृषी बाजार; महाराष्ट्राच्या कृषी निर्यातीला मिळणार नवी झेप

वाढवण बंदराजवळ जागतिक दर्जाचे कृषी व्यापार केंद्र; 10 हजारांहून अधिक रोजगार, शेतमाल निर्यातीला मोठी चालना मुंबई: पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील दापचरी येथे 558.43 हेक्टर (1,395 एकर) क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्यात येणार आहे. वाढवण बंदराजवळ विकसित होणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना थेट जागतिक बाजारपेठेशी जोडणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. मंत्रालयात […]

अधिक वाचा..

‘आई’ पर्यटन योजनेला पुणे विभागातून उत्स्फूर्त प्रतिसाद; १,७०० हून अधिक महिलांचे अर्ज

पुणे: पर्यटन क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारची ‘आई’ पर्यटन योजना मोठा आधार ठरत आहे. या योजनेअंतर्गत महिला उद्योजिकांना पर्यटनाशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी १५ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जात असून, पुणे विभागातून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पर्यटन संचालनालय, पुणे यांच्या माहितीनुसार, राज्यभरातून आतापर्यंत सुमारे ४ हजार […]

अधिक वाचा..

डॉक्टरांची कमाल! 1 हजार किलोमीटर दूरच्या 2 रुग्णांवर केली रोबोटिक टेलीसर्जरी

मुंबई: भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत अभूतपूर्व यश मिळवत, नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि ख्यातनाम शल्यचिकित्सक डॉ. राज गजभीये यांनी देशात पहिल्यांदाच “टेलीसर्जरी” करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ही शस्त्रक्रिया गुरुग्रामहून सुमारे १००० किलोमीटर दूर असलेल्या नागपूरमधील GMCH मध्ये त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. ही अद्वितीय शस्त्रक्रिया भारतात बनवलेल्या ‘SSI मंत्रा सर्जिकल रोबोटिक सिस्टीम’ […]

अधिक वाचा..

तुकडेबंदी कायदा रद्द; आता 1, 2, 3 गुंठे जमिनीची विक्री कायदेशीर

संभाजीनगर: राज्याच्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची ऐतिहासिक घोषणा* केली आहे. या निर्णयामुळे सुमारे ५० लाख नागरिकांना थेट फायदा होणार असून, वर्षानुवर्षे अडकलेली शेतीविक्रीची प्रकरणं मार्गी लागणार आहे. काय होता तुकडेबंदी कायदा महाराष्ट्र शासनाच्या १२ जुलै २०२१ च्या परिपत्रकानुसार, १, २, ३ गुंठ्यांमध्ये शेतीजमीन खरेदी-विक्रीस बंदी होती. यामुळे विहिरीसाठी, शेतरस्त्यासाठी किंवा […]

अधिक वाचा..

धान-भरडधान्य खरेदीसाठी शासकीय पोर्टलवर नोंदणी करण्यास 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती मुंबई: शासकीय खरेदी केंद्रावर धान/भरडधान्य विक्रीसाठी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याकरिता ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत होती. मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने विविध लोकप्रतिनिधिच्या मागणीस अनुसरून शासनाने नोंदणीसाठी 15 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक […]

अधिक वाचा..