शिरुर पंचायत समिती रस्त्यावर ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अपघातात एका महीलेचा मृत्यू,

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर पंचायत समितीच्या आवारात जाण्या-येण्यासाठी मुख्य रस्ता ते दत्त मंदीर या रस्त्याचे सिमेंट कॉक्रेटचे काम चालू असुन हे काम सुरु असताना नागरीकांना जाण्या-येण्यासाठी कोणताही प्रतिबंध व उपाययोजना ठेकेदाराने केल्या नसल्याने याच रस्त्यावरुन शारदा गायकवाड ही महिला (दि 8) रोजी सकाळी 10:30 च्या दरम्यान पायी जात असताना भरधाव वेगाने रिव्हर्स गियर टाकून सिमेंट […]

अधिक वाचा..

रस्ता ओलांडताना बच्चू कडूंचा अपघात

अमरावतीतील एका खाजगी रुग्णालयात बच्चू कडू यांच्यावर उपचार सुरु  मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यातील आमदारांच्या अपघाताची मालिकाच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार जयकुमार गोरे, आमदार धनंजय मुंडे, आमदार योगेश कदम यांच्या कारचा अपघात झाला होता. त्यातच आता प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. रस्ता ओलांडताना दुचाकीने बच्चू कडू यांना […]

अधिक वाचा..

शिक्रापूर चाकण रस्त्यावर दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू….

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर चाकण बाजूकडून एका दुचाकीवरुन तिघेजन आलेल्या दुचाकीची एका वृद्धाला धडक बसल्याने फुलचंद विठोबा रणदिवे या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दुचाकी चालकासह त्याच्या साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर चाकण रस्त्यालागत असलेल्या एस्सार पेट्रोल पंप समोरुन फुलचंद रणदिवे हे […]

अधिक वाचा..

नवीन वर्षाचा पहिला रविवार ठरला घात वार

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथील उचाळे वस्ती येथील ज्ञानेश्वर (माऊली) प्रभाकर उचाळे या ३२ वर्षीय युवकाचा रविवार (दि १) सायंकाळच्या सुमारास उचाळेवस्ती रोडवर झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ज्ञानेश्वर हा सायंकाळच्या वेळी मोटरसायकल वर चाललेला असताना चार चाकी वाहनाने त्याच धडक […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गावर एस टी व क्रेनचा भीषण अपघात

सणसवाडी नजीक कल्याणी फाट्यावर अपघातात बारा प्रवाशी जखमी शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) नजीक पुणे नगर महामार्गावर कल्याणी चौक येथे एस टी व क्रेनचा भीषण अपघात होऊन झालेल्या अपघातात तब्बल 12 प्रवाशी जखमी झाल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन […]

अधिक वाचा..

पाबळ मध्ये अपघातानंतर टोळक्याकडून व्यक्तींना मारहाण

मारहाण करत दोन वाहनाच्या काचा व टायर फोडून नुकसान शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथे 2 वाहनांचा किरकोळ अपघात झाल्यानंतर चर्चा सुरु असताना दहा जणांच्या टोळक्याने काही इसमांना मारहाण करत त्यांच्या 2 वाहनांच्या काचा व टायर फोडून नुकसान केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अर्जुन जाधव या युवकासह अनोळखी 9 जणांवर गुन्हे […]

अधिक वाचा..

समृद्धी महामार्गावर कार जळून खाक…

वैजापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या नागपूर -शिर्डी या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण सोहळा पार पडलं. परंतु उद्घाटनानंतर या महामार्गावर अपघातांची मालिका सुरु झाल्याने हा मार्ग पुन्हा चर्चेत आला आहे. अशातच औरंगाबादच्या वैजापूर जवळील गलांडे वस्तीजवळ एका धावत्या कारने अचानक पेट घेतला. आग भडकल्याने कार काही क्षणात जळून खाक झाली. ही कार पुण्यातील नितीन […]

अधिक वाचा..

कान्हूरच्या अपघातग्रस्ताच्या मदतीस एकवटला सारा गाव

कान्हूर मेसाईतील अंकुश ननवरेंना गावकऱ्यांचा मदतीचा हात शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील अंकुश ननवरे यांचा अपघात झालेला असताना त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना उपचारासाठी मोठ्या रकमेची गरज असताना गावातील नागरिकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून चक्क 51 हजार रुपयांची मदत संकलित करत सोशल मिडीयाचा चांगला वापर करत अपघातग्रस्त व्यक्तीसाठी मदतीचा हात पुढे केला […]

अधिक वाचा..

आर्यन पुंडेच्या अपघातानंतर उपचारासाठी एकवटले विद्यार्थी व शिक्षक

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या आर्यन पुंडेचा शाळेत कब्बडीचा सराव करताना अपघात होऊन हात मोडला, आर्यनच्या वडिलांचे छत्र हरपलेले असल्याने त्याच्या आईवर बचत गटातून कर्ज काढण्याची वेळ आलेली असताना शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना ग्रामस्थांनी पुढाकार घेत आर्यनच्या उपचारासाठी हजारो रुपयांची मदत करुन आर्यनच्या आईला मदतीचा हात दिला […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पाबळ रस्त्यावर दोन वाहनांची समोरासमोर धडक

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बेल्हा जेजुरी महामार्गावरील शिक्रापूर पाबळ रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण घडत असताना नुकतेच दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन एक चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मिलिंद नामदेव मंचरे या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर ता. शिरुर येथील पाबळ शिक्रापूर रस्त्यावरुन शहाजी चव्हाण (दि. २८) […]

अधिक वाचा..