शिरुर पंचायत समिती रस्त्यावर ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अपघातात एका महीलेचा मृत्यू,

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर पंचायत समितीच्या आवारात जाण्या-येण्यासाठी मुख्य रस्ता ते दत्त मंदीर या रस्त्याचे सिमेंट कॉक्रेटचे काम चालू असुन हे काम सुरु असताना नागरीकांना जाण्या-येण्यासाठी कोणताही प्रतिबंध व उपाययोजना ठेकेदाराने केल्या नसल्याने याच रस्त्यावरुन शारदा गायकवाड ही महिला (दि 8) रोजी सकाळी 10:30 च्या दरम्यान पायी जात असताना भरधाव वेगाने रिव्हर्स गियर टाकून सिमेंट मिक्सर ट्रकच्या चालकाने निष्काळजीपणे महीलेला जोरात धडक दिल्याने सदर महीलेला गंभीर दुखापत होऊन ती मृत्यूमुखी पडली आहे. या महीलेला उपचारासाठी न नेता ट्रकचालक सत्येंद्र कमल सिंग सुनोरी हा फरार झाला आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि 8) रोजी सकाळी 10:30 च्या सुमारास शिरुर पंचायत समीतीच्या आवारातील दत्त मंदिर ते मुख्य रस्ता या अंतर्गत रस्त्याचे सिमेंट कॉक्रीटचे काम चालु असलेल्या रोडवर लोकांना येण्या-जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध न केल्याने या ठिकाणी पायी जाणारी महिला शारदा सखाराम गायकवाड (वय ४७ वर्षे) रा.नारायणगव्हाण ता. पारनेर जि.अहमदनगर यांना सिमेंट मिक्सर ट्रक नं. MH 16 5258 वरील चालक सत्येंद्र कमल सिंग सुनौरी याने भरधाव वेगात गाडी रिव्हर्स घेतल्याने या महिलेला धक्का बसल्याने ती जखमी झाली अपघातानंतर चालक सत्येंद्र कमलसिंग सुनौरी हा पळुन गेला आहे.

या अपघाताग्रस्त महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असुन मृत महिलेचा मुलगा महेश गायकवाड याने शिरुर पोलिस स्टेशन येथे याबाबत फिर्याद दाखल केली असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिल उगले हे करत आहेत.