बेल्हा- जेजूरी रोडवर पिंपरखेड गावच्या हद्दीत अपघातात तरुण युवकाचा मृत्यू…

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): पिंपरखेड (ता. शिरुर) येथील अविनाश गावशेते (वय २२) हा आई -बापाला एकुलता एक असणाऱ्या तरुणाचा बेल्हा- जेजुरी रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्याला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या अपघाती मृत्यूने त्याच्या कुंटुबासह पिंपरखेड गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. ११) रोजी रात्री ०८ :१५ वा सुमारास मौजे पिंपरखेड (ता. शिरुर) जि पुणे गावचे हद्दीत बेल्हा जेजुरी रोडवर बो-हाडेवस्ती येथे बेल्हा जेजुरी रोडवर अविनाश नवनाथ गावशेते (वय 2२) रा पिंपरखेड (ता. शिरुर) जि पुणे हा त्याची मोटार सायकल नं. एम एच १४ एच २१७८ हि चालवित घेवुन लाखनगाव येथुन पिंपरखेड बाजुकडे येत असताना त्याच्या मोटार सायकलला कोणत्या तरी अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील अज्ञात वाहनाने धडक देवुन अपघात करुन त्या अपघातात अविनाश नवनाथ गावशेते याच्या हाताला, पायाला, डोक्याला गंभीर दुखापती होण्यास व त्याच्या मृत्युस तसेच मोटार सायकलचे नुकसानीस कारणीभुत होवुन अपघाताची खबर न देताच पळुन गेला आहे. म्हणुन त्या अज्ञात वाहनावरील अज्ञात चालका विरूध्द कायदेशीर शिरुर पोलिस स्टेशनमध्ये कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर हे करत आहे.

मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी शिरुर डेड हाऊसला मोठा विलंब लागत आहे. रात्रभर मृतदेह शवविच्छेदन केंद्रात पडून असतो. त्यामुळे लांबून येणाऱ्या नातलगांना विनाकारण ताटकळत राहावे लागते. तालुक्यातील अपघाती मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना आपले दु :ख बाजूला ठेवून लवकर शवविच्छेदन करुण घेण्यासाठी राजकिय लोकांना फोन करावा लागत आहे. हा अतिशय खेदजनक प्रकार असल्याने तालुक्यातून याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.